Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजन

कपिल शर्माच्या कनाडामधील कैफेवर पुन्हा गोळीबार, मिळाला धमकीचा संदेश

Kapil Sharma Canada Cafe Firing: प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेजवळ पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या एका वर्षात अशा प्रकारची ही चौथी घटना असल्याने परिसरातील सुरक्षेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.

रिपोर्ट्सनुसार, ही ताजी घटना कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील Surrey परिसरात घडली. कपिल शर्माच्या ‘Caps Cafe’ जवळील एका रेस्टॉरंटवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचं सांगितलं जात आहे.

सोशल मीडियावर एका फेसबुक अकाउंटवरून (टायसन बिश्नोई, जोरा सिद्धू या नावाने) पोस्ट शेअर करत कपिल शर्मा आणि कॅफेच्या मालकाला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला आहे. या पोस्टमध्ये लाइनमध्ये या, नाहीतर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या सर्व दाव्यांची अधिकृत पातळीवर स्वतंत्र पुष्टी झालेली नाही.

हेही वाचा –  खुशखबर! अपात्र लाडक्या बहि‍णींचे १५०० रुपये पुन्हा सुरु होणार…? शासनाकडून अपिलाची संधी?

या प्रकरणाचा संबंध Lawrence Bishnoi gang शी जोडला जात असल्याचा दावा काही अहवालांमध्ये करण्यात आला आहे. यापूर्वीही या गँगशी संबंधित लोकांनी सोशल मीडियावर अशा घटनांची जबाबदारी स्वीकारल्याचे म्हटले गेले होते. कपिल शर्माच्या कॅफेला लक्ष्य करण्याच्या घटना 2025 पासून समोर येत आहेत:

10 जुलै 2025 कॅफे सुरू झाल्यानंतर काही दिवसांतच पहिला गोळीबार. 7 ऑगस्ट 2025 त्याच ठिकाणी पुन्हा फायरिंग. 15-16 ऑक्टोबर 2025 चार महिन्यांत तिसऱ्यांदा हल्ला. या सलग घटनांमुळे हे केवळ एकदाच घडलेलं प्रकरण नसून एक पॅटर्न असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या घटनांवर प्रतिक्रिया देताना कपिल शर्माने याआधीच चिंता व्यक्त केली होती. त्याच्या Kis Kisko Pyaar Karoon 2 च्या ट्रेलर लॉन्चवेळी त्याने म्हटलं होतं की, तिथल्या कायद्यांकडे अशा घटना रोखण्याची पुरेशी ताकद नसावी.

काही दाव्यांनुसार, सलमान खान याच्याशी संबंधित कारणामुळेही कॅफे टार्गेट करण्यात आल्याची चर्चा आहे. ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’च्या लॉन्चवेळी सलमान खानला आमंत्रित केल्यामुळे काही गट नाराज झाल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या कारणांचीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button