ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी सध्या बिग बॉसमुळे चर्चेत

गौतमी पाटीलवर केलेल्या टीकेमुळे चर्चा, वाकडे तिकडे चाळे करून अश्लीलता दाखवल्याचा आरोप

मुंबई : छोटा पुढारी सध्या बिग बॉसमुळे चर्चेत आला आहे. बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सीजनमध्ये घनश्याम दरोडे हा स्पर्धक म्हणून सहभागी झाला आहे. घनश्याम दरोडे म्हणजे छोटा पुढारी यांने आपल्या शैलीने सगळ्यांचं ध्यान आकर्षित केले आहे. घनश्याम दरोडे याने काही दिवसाआधी प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलवर टीका केली होती. गौतमी पाटील आणि छोटा पुढारी यांच्यात वाकयुद्ध पाहायला मिळाले होते. छोटा पुढारी आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये भूमिका मांडताना चांगलाच आक्रमक होताना दिसत आहे. पण त्याआधी काही दिवसांपूर्वी त्याने गौतमी पाटीलवर केलेल्या टीकेमुळे चर्चा मिळवली होती. गौतमी पाटीलबाबत बोलताना तो म्हणाला होता की, महाराष्ट्राचा बिहार करू नको. वाकडे तिकडे चाळे करून अश्लीलता दाखवल्याचा आरोप देखील छोटा पुढारी याने केला होता. त्यावर गौतमी पाटीलने देखील त्याला उत्तर दिले होते.

गौतमी पाटील काय म्हणाली होती
गौतमी पाटील म्हणाली की, “तो काय बोलला मला माहीत नाही. मी त्याचा व्हिडीओ पाहिला नाही. तो कोण आहे मला माहिती नाही. मी महाराष्ट्राची संस्कृती जपतेय. सर्व गोष्टी सोडून मी पुढे जात आहे. तुम्हाला फक्त गौतमी पाटीलच का दिसते असा प्रश्न ही तिने केला होता. इतरांकडेही लक्ष द्या. मी महाराष्ट्राचा बिहार काय केला. मला त्याचं आधी उत्तर द्या. मी काय चुकली आहे ते मला सांगा. त्यानंतर पुढे बोला.

बिग बॉसच्या घरात करतोय धमाल
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमांना महाराष्ट्रात मोठी गर्दी होताना पाहायला मिळत आहे. गौतमी पाटीलने राज्यात चांगलीच प्रसिद्धी मिळवली आहे. अनेक कार्यक्रमांना लोकं गौतमी पाटीलला बोलवत आहेत. पण महाराष्ट्राचा छोटा पुढारी देखील महाराष्ट्रात चर्चत राहणारा व्यक्ती आहे. त्याने आपल्या बोलण्याच्या स्टाईलने लोकांचं मन जिंकले आहे. छोटा पुढाली आता बिग बॉसच्या घरात मस्ती करताना दिसत आहे. बिग बॉस मराठीच्या खेळात त्याने घेतलेल्या भूमिका देखील चर्चेत आल्या आहेत. छोटा पुढारी हा थेट बोलण्यासाठी ओळखला जातो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button