breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

गौतमी पाटील आता चित्रपटात झळकणार; परदेशात झालं शुटिंग

पुणे : गौतमी पाटील हे नाव कायम चर्चेचा विषय राहिलेलं आहे. अश्लील नृत्यामुळे काही दिवसांपासुन हे नाव अनेक वादात आहे. अलिकडेच तिझं एक गाणं आलेलं आहे. या गाण्यामुळे गौतमीचे चाहते भलतेच खुश आहेत. यातच आता तिच्या नवीन चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाची आत्तापासुनच उत्सुकता लागली आहे.
गौतमी पाटील ‘घुंगरू’ या तिच्या आगमी चित्रपटातुन प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे. घुंगरु या सिनेमाचं शूटिंग सोलापूर, माढा, हंपी यासह परदेशातही झाल्याचं समजत आहे. मात्र या सिनेमात गौतमी नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार आहे हे अद्याप समोर आलं नाही. परंतु तिच्या चाहत्यांना या चित्रपटाची चांगलीच उत्सुकता लागून राहिली आहे. तिच्या कार्यक्रमांना आजकाल तूफान गर्दी होते. अगदी स्टेजपासून ते लांबवर लोक उभे राहून तिचे कार्यक्रम बघतात. तिच्या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांना तिच्या चाहत्यांना आवर घालावा लागतो. त्यामुळे आता तिच्या येणारा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालण्याची शक्यता आहे.
गौतमी पाटील सोशल मीडियावर आपल्या व्हीडिओमुळे धुमाकूळ घालत आहे. एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे गौतमी पाटील एका रात्रीत प्रसिद्धीच्या झोतात आली होती. आपला डान्स आणि एक्स्प्रेशन्सने तीने तरुणाईला वेड लावलं आहे. 26 वर्षीय गौतमी ही डान्सर असून ती लावणी क्वीन म्हणून ओळखली जाते. यूट्यूब, इन्स्टाग्राम, फेसबुक यांसारख्या सोशल प्लॅटफॉर्मवर तिचे व्हिडिओ तुफान व्हायरल होतात.
मात्र गेल्या काही दिवसांपासून ती वेगवेगळ्या कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात आहे. सोशल मीडियावर तिला प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागत असला तरी तिचा मोठा चाहतावर्ग आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button