लग्न कधी करणार? गौतमी पाटीलने दिलं उत्तर; म्हणाली..
![Gautami Patil said that I will not get married soon](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/09/Gautami-Patil-780x470.jpg)
मुंबई : लावणी नृत्यांगना गौतमी पाटील तिच्या नृत्यामुळे सातत्याने चर्चेत असते. अनेकदा तिच्या नृत्य सादरीकरणामुळे तिच्यावर टीका होते. पण तिची लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. गौतमी पाटीलचा बॉयफ्रेंड कोण? ती लग्न कधी करणार याची अनेकदा अफवा पसरत असते. दरम्यान, यावरून स्वत: गौतमीने उत्तर दिलं आहे.
गौतमी पाटील म्हणाली, मी इतक्यात लग्न करणार नाही. माझ्या मनात जोपर्यंत येत नाही किंवा माझी आई मला जोपर्यंत म्हणत नाही… आजही माझ्या घरात माझ्या लग्नाचा विषय निघतो. तू लग्न कधी करणार? असं मला विचारत असतात. त्यामुळे घरचे जेव्हा ठरवतील आणि मला जेव्हा मनापासून वाटेल तेव्हा मी लग्न करेन. मी अरेंज मॅरेज करेन. मी आतापर्यंत अनेक गोष्टींमधून गेले आहे आणि त्या सगळ्या गोष्टी स्वीकारणारा नवरा मला हवा आहे.
हेही वाचा – ‘नवं संसद भवन म्हणजे पंतप्रधान मोदींचं मल्टिप्लेक्स’; संजय राऊतांची टीका
माझ्या नवऱ्याची पसंती माझ्या आईचीही असेल आणि माझीही असेल. आईची पसंतीही माझ्यासाठी तितकीच महत्त्वाची आहे. मी आईला एकटीला कधीही सोडू शकत नाही. मी घरी आल्यावर आई मला दिसली नाही तर माझी चिडचिड होते. तिला मला कोणी नाही आणि माझ्याशिवाय तिला कोणी नाही. त्यामुळे याचाही विचार मी लग्न करताना निश्चितच करेन, असंही गौतमी पाटील म्हणाली.