प्रसिद्ध युट्युबर भुवन बामच्या आई-वडिलांचे कोरोनाने निधन
![Famous YouTuber Bhuvan Bam's parents die in Corona](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/06/Eva_BB.jpg)
मुंबई – कोरोना विषाणूने अनेकांचे प्रियजन आणि स्वप्न हिरावून घेतले आहेत. प्रसिद्ध युट्युबर आणि कॉमेडियन भुवन बाम याच्या आई-वडिलांचेही कोरोनाने निधन झाले आहे. भुवनने स्वत: पालकांसोबतचा फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत याबाबत माहिती दिली.
भुवनने लिहिलंय, ‘माझ्या दोन्ही लाइफलाईन कोविडमध्ये गमावल्या. आई आणि बाबाशिवाय आता काहीच पहिल्यासारखं होणार नाही. एका महिन्यात सगळं अस्ताव्यस्त झालं. घर, स्वप्न सगळं काही. माझी आई माझ्याजवळ नाही, बाबा माझ्यासोबत नाही. आता सुरुवातीपासून जगायला शिकावं लागेल. मन मान्य करत नाही.’ त्याचबरोबर ‘मी त्यांना वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न केले? मला या प्रश्नांसह आता जगले पाहिजे. त्यांना पुन्हा पाहण्यासाठी प्रतीक्षा करू शकत नाही. मी आशा करतो की तो दिवस लवकरच येईल’, असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, भुवन बाम हा त्याच्या लोकप्रिय ‘बीबी की वाईन्स’ व्हिडिओंसाठी प्रसिद्ध आहे. यात तो कॉमेडी व्यक्तीरेखा साकारतो. तसेच भुवन गायकदेखील आहे.