ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

फेम अभिनेता नितीन चौहानच्या मृत्यूमागचं कारण समोर

मानसिक आरोग्यासाठी उपचार घेत होता, ‘तेरा यार हूँ मै’ या मालिकेत शेवटचं काम

दिंडोशी : ‘स्प्लिट्सविला’ आणि ‘क्राइम पॅट्रोल’ फेम अभिनेता नितीन चौहानने टोकाचं पाऊल उचलत सर्वांना मोठा धक्का दिला. 6 नोव्हेंबर रोजी मुंबईतील गोरेगाव इथल्या राहत्या घरी तो मृतावस्थेत आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असून त्याच्या मृत्यूमागचं कारण समोर आलं आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून काम मिळत नसल्याने नितीन नैराश्याचा सामना करत होता. याच नैराश्यातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नितीन त्याच्या मानसिक आरोग्यासाठी उपचारसुद्धा घेत होता, असं त्याच्या पत्नीने सांगितलं आहे. प्राथमिक चौकशीदरम्यान आम्हाला असं कळलंय की नितीनला गेल्या काही वर्षांपासून काम मिळत नव्हतं. यामुळे तो नैराश्यात होता, अशी माहिती दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अजय आफळे यांनी दिली. नितीनने तीन वर्षांपूर्वी सब टीव्हीवरील ‘तेरा यार हूँ मै’ या मालिकेत शेवटचं काम केलं होतं.

संघर्षाच्या काळात नितीनने छोटा व्यवसाय करण्याचाही प्रयत्न केला होता. त्याने आईस्क्रीमची फ्रँचाइजी उघडली होती. मात्र या व्यवसायातही त्याला अपयश मिळालं. नितीन त्याच्या पत्नी आणि मुलीसोबत गोरेगावमध्ये राहत होता. गुरुवारी संध्याकाळी त्याची पत्नी आणि मुलगी सोसायटीच्या पार्कात फिरायला गेले असता नितीनने गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं. पत्नी आणि मुलगी जेव्हा घरी परतले तेव्हा त्यांना दरवाजा आतून बंद असल्याचं निदर्शनास आलं. त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यातही त्यांना अपयश आलं. अखेर त्यांनी आजूबाजूच्यांच्या मदतीने दरवाजा तोडून आत शिरण्याचा प्रयत्न केला. तेव्हा नितीन त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला.

दिंडोशी पोलीस याप्रकरणी पुढील तपास करत असून नितीनच्या शवविच्छेदनाच्या अहवालाची त्यांना प्रतीक्षा आहे. 35 वर्षीय नितीनने ‘दादागिरी 2’ हा रिॲलिटी शो जिंकला होता. मूळचा उत्तरप्रदेशमधील अलिगड इथला नितीन हा या शोनंतर प्रकाशझोतात आला होता. त्यानंतर त्याने विविध मालिका आणि शोजमध्ये आपल्या दमदार अभिनयाची, प्रतिभेची चुणूक दाखवली. तो ‘एमटीव्ही स्पिट्सव्हिला 5’मध्येही झळकला होता. त्याचसोबत ‘जिंदगी डॉट कॉम’, ‘क्राइम पेट्रोल’, ‘फ्रेंड्स’ यांसारख्या सीरिजमध्येही त्याने काम केलंय.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button