Breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

इराण-अमेरिका संघर्षात इशा गुप्ता UAE मध्ये अडकली; म्हणाली ‘वातावरण भीतीदायक’

Esha Gupta | इराण-अमेरिका संघर्षामुळे मध्यपूर्वेत तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली असताना बॉलिवूड अभिनेत्री इशा गुप्ता UAE मध्ये अडकल्याची माहिती समोर आली आहे. इशाने स्वतः इन्स्टाग्राम पोस्टद्वारे परिस्थितीची माहिती देत चाहत्यांना आश्वस्त केले आहे. सध्या ती आणि तिच्यासोबतचे सदस्य सुरक्षित असले तरी वातावरण भीतीदायक असल्याचे तिने म्हटले आहे.

इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत क्षेपणास्त्र हल्ले केल्याच्या पार्श्वभूमीवर मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान इशा गुप्ता UAE मध्ये असल्याने ती या तणावाच्या छायेत अडकली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करताना इशाने चाहत्यांची माफी मागत, “मी रिप्लाय देऊ शकले नाही, पण मी आणि माझ्यासोबतचे लोक सुरक्षित आहोत. मात्र इथलं वातावरण भीतीदायक आणि कठीण आहे,” असे नमूद केले.

हेही वाचा       :              टी-२० विश्वचषकात आज भारत-विंडीज आमनेसामने; ‘करो वा मरो’ची लढत 

तिने पुढे UAE प्रशासनावर विश्वास व्यक्त करत देवाकडे प्रार्थना केल्याचे सांगितले. “येथील संरक्षण मंत्रालय आणि मदत यंत्रणांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. इथे अडकलेल्या सर्व लोकांच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते. लवकरच घरी परतण्याची आशा आहे,” असेही तिने पोस्टमध्ये लिहिले.

इशा सध्या नेमक्या कोणत्या ठिकाणी आहे, याची स्पष्ट माहिती तिने दिलेली नसली तरी तिच्या एका पोस्टमध्ये अबू धाबीचा उल्लेख असल्याने ती तिथेच असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इशा गुप्ता ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री असून अक्षय कुमारसोबतच्या ‘रुस्तम’ चित्रपटातील तिच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. तसेच बॉबी देओलच्या ‘आश्रम’ या वेब सिरीजमधील तिची भूमिका देखील चर्चेत राहिली होती.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button