Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राऊळगाव स्फोटात 17 जणांचा मृत्यू,18 कामगार जखमी, मृतांच्या वारसांना पाच लाख

Share On

नागपूर : जिल्ह्यातील राऊळगाव येथे स्फोटकांच्या एका फॅक्टरीत झालेल्या स्फोटाची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या वारसांना पाच लाख रुपये आर्थिक मदत देण्याचे जाहीर केली आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

याशिवाय संबंधित कंपनी देखील मृतांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देणार आहे. मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, मी स्थानिक प्रशासनाशी सातत्याने संपर्कात आहे. जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक हे तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत. एनडीआरएफ, एसडीआरएफचे पथक सुद्धा घटनास्थळी आहे. ‘पेसो’ आणि ‘डिश’ यांची पथके पोहोचली आहेत.

हेही वाचा –  रंगांसोबत खेळण्याआधी त्वचेचं करा संरक्षण, जाणून घ्या ‘या’ स्किन केअर टिप्स

मदतकार्याला वेग देण्यात आला असून आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत १८ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने नागपूरला हलवण्यात आले आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button