बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स
![ED summons Bollywood actress Yami Gautam](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/07/yami-gautam.jpg)
मुंबई – अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीकडून सध्या महाराष्ट्रात धडक कारवाया सुरू आहेत. त्यातच आता ईडीने आपला मोर्चा बॉलिवूडकडेही वळवला आहे. बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतमला ईडीने समन्स बजावले आहे. फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याने पुढील आठवड्यात जबाब नोंदवण्यास हजर राहावे, असे आदेश ईडीने यामीला दिले आहेत.
दरम्यान, फेमा हा परकीय चलनासंबंधित कायदा आहे. यानुसार परदेशातून काही वस्तू-सेवांबाबत केलेल्या व्यवहारांची नोंद ठेवली जाते. यामध्ये काही गडबड किंवा शंका आढळल्यास कारवाई केली जाते. फेमा कायद्यानुसार व्यवहार झालेली देशी किंवा परदेशी मालमत्ता जप्त करता येते. याप्रकरणी ईडीने दुसऱ्यांदा यामी गौतमला समन्स बजावलं आहे.
हिंदी सिनेसृष्टी गाजवणारी यामी गौतम हिने गेल्याच महिन्यात 4 जून रोजी गुपचूप लग्नगाठ बांधली. तिने सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट करत ही आनंदाची बातमी शेअर केली होती. यामीने आदित्य धरसोबत लग्न केले आहे. आदित्य धर हा ‘उरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे.