दीपिका पादुकोणला हॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्याच्या मुलाची व्हायचं होतं आई
Deepika Padukone : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दीपिकाने मोठा खुलासा केला आहे. हॉलिवूड अभिनेता विन डीजलच्या मुलाची आई होण्याची माझी इच्छा होती, असं दीपिकाने म्हटलं आहे. दीपिकाच्या या वक्तव्याने रणवीरचे चाहते नाराज झाले आहेत.
‘द एलेन डिजेनर्स शो’ या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात दीपिका पादुकोणने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने विन डीजलबद्दल एक धक्कादायक वक्तव्य केलं होतं. अभिनेत्री म्हणाली होती की,मी विन डीजलची मोठी चाहती असून त्याच्या मुलाची आई होण्याचाही मी विचार केला होता. दीपिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
हेही वाचा – Parliament Of India : संसदेची सुरक्षा नेमकी कशी असते? वाचा सविस्तर..
दीपिका पादुकोणने २०१७ मध्ये ‘XXX: Return Xander Cage’ या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या सिनेमात दीपिकासोबत विन डीजल मुख्य भूमिकेत होता. या सिनेमातील दीपिकाच्या बोल्डनेस आणि लुक्सचं खूप कौतुक झालं होतं. दीपिकाचा हा हॉलिवूड अॅक्शनपट होता. पण सहकलाकार विन डीजलसोबत संसार थाटण्याच्या वक्तव्यामुळे दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं.