दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह सध्या प्रचंड आनंदात
खास पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याचे जाहीर, शुभेच्छांचा वर्षाव
![Deepika Padukone, Ranveer Singh, Prachanda, Anand, Special, Post, Share, Girl, Announce, Happy, Year,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/09/dipila-and-ranvir-780x470.jpg)
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे सध्या प्रचंड आनंदात आहेत. दीपिका पादुकोण हिने कालच म्हणजे 8 सप्टेंबर 2024 रोजी एका गोंडस मुलीला जन्म दिला. हेच नाही तर दीपिका पादुकोण आणि रणवीर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याचे जाहीर केले. दीपिका पादुकोण हिने मुंबईमध्येच बाळाला जन्म दिला. त्यापूर्वीच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह हे मुंबईतील सिद्धीविनायक मंदिरात दर्शनासाठी गेले. खास बनारसी साडीमध्ये दीपिका पादुकोण ही मंदिरात पोहोचली होती. दीपिका पादुकोण हिने शेअर केलेल्या पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट या केल्या जात आहेत.
दीपिका पादुकोण हिने शेअर केलेल्या पोस्टवर अनेक कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. सध्या सोशल मीडियावर दीपिका पादुकोण हिचे तिच्या बाळासोबतचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत. ते फोटो खरोखरच दीपिका पादुकोण आणि तिच्या बाळाचेच आहेत का? हा प्रश्न विचारला जातोय. मात्र, व्हायरल होणारे फोटो हे दीपिका पादुकोण आणि तिच्या बाळाचे नाहीत.
दीपिका पादुकोणचे तिच्या बाळासोबतचे रूग्णालयातील व्हायरल होत असलेले फोटो हे खरे नाहीत. व्हायरल होणारे ते फोटो जनरेट केलेले आहेत. व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये दीपिका पादुकोण ही रूग्णालयातील बेडवर झोपलेली दिसत आहे. हेच नाही तर तिच्या मांडीवर बाळ देखील दिसत आहे जनरेट बरेच फोटो सध्या दीपिका पादुकोणचे व्हायरल होताना दिसत आहेत.
दीपिका पादुकोण हिने खास पोस्ट शेअर करत मुलगी झाल्याचे सांगितले. त्यानंतर अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. दीपिका पादुकोण हिला सतत शुभेच्छा दिल्या जात आहेत. दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांनी काही महिन्यांपूर्वीच पोस्ट शेअर करत बाळाचे आगमन लवकरच होणार असल्याचे जाहीर केले. दीपिका पादुकोण ही विदेशात बाळाला जन्म देणार असल्याचे सांगितले गेले.
दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह यांच्या घरी लग्नाच्या सहा वर्षानंतर बाळाचे आगमन झाले. एका मुलाखतीमध्ये बोलताना रणवीर सिंह याने म्हटले होते की, त्याला मुलगी हवी आहे आणि खरोखरच त्याला मुलगी झाली. दीपिका पादुकोण ही आज बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक आहे. दीपिका पादुकोणची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फॉलोइंग बघायला मिळते.