Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्र

९८व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी ‘दशावतार’ची निवड; दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा डंका

Dashavatar | मराठी चित्रपटसृष्टीसाठी अभिमानास्पद ठरणारी मोठी बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांची मुख्य भूमिका असलेल्या दशावतार या चित्रपटाची थेट ९८व्या ऑस्कर पुरस्कारांच्या मुख्य स्पर्धेसाठी अधिकृत निवड झाली आहे. जगभरातील हजारो चित्रपटांमधून निवडल्या गेलेल्या अवघ्या १५० चित्रपटांत ‘दशावतार’चा समावेश झाला असून, हा एकमेव मराठी चित्रपट ठरला आहे.

२०२५ मध्ये ‘दशावतार’ने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट होण्याचा मान मिळवला होता. कोकणच्या लाल मातीतील समृद्ध लोककला, दशावतार परंपरा आणि कलेवर निस्सीम प्रेम करणाऱ्या कलाकाराचा प्रवास या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात आला आहे. दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली बाबुली मिस्त्री ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली असून त्यांच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

हेही वाचा     :        मुंबईत श्रेय लुटणारी टोळी सक्रिय; देवेंद्र फडणवीस यांची ठाकरे बंधूंवर टोलेबाजी

या आनंदाची माहिती देताना लेखक-दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत. ‘दशावतार’च्या माध्यमातून कोकणात खदखदत असलेल्या महत्त्वाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्द्यांना त्यांनी स्पर्श केला होता.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांच्यासह महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे, प्रियदर्शिनी इंदलकर, विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे आणि आरती वडगबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. बॉक्स ऑफिसनंतर आता थेट ऑस्करच्या व्यासपीठावर पोहोचलेला ‘दशावतार’ मराठी सिनेसृष्टीचा जागतिक ठसा उमटवणार असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button