दोन आठवड्यांपासून 20 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या ‘छावा’ सिनेमाची घट
सिनेमा लवकरत 500 कोटींच्या घरात एन्ट्री , ‘गदर 2’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल नाही.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार
मुंबई : अभिनेता विकी कौशल स्टारर ‘छावा’ सिनेमाला प्रदर्शित होऊन आज तीन आठवडे झाले आहेत. 14 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमा आजही मोठ्या पडद्यावर चाहत्यांचं मनोरंजन करतना दिसत आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून 20 कोटींपेक्षा अधिक कमाई करणाऱ्या ‘छावा’ सिनेमाची कमाई घट झाल्याचं चित्र दिसून येत आहे. गेल्या तीन दिवसांपासून सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावला आहे. त्यामुळे ‘छावा’ सिनेमा ‘गदर 2’ सिनेमाचा रेकॉर्ड मोडू शकतो का? पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
गेल्या 21 दिवसांपासून बॉक्स ऑफिसवर ‘छावा’ सिनेमाचं राज्य आहे. मिळालेल्या रिपोर्टनुसार, 21 व्या दिवशी सिनेमाने जवळपास 5.35 कोटींचा गल्ला जमा केला आहे. ‘छावा’ सिनेमाने आतापर्यंत 483.40 कोटींचा गल्ला जमा केला आहे. आता सिनेमा 500 कोटींचा आकडा पार करण्यात यशस्वी होतो की नाही, पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
‘छावा’ सिनेमाच्या पहिल्या आठवड्याची कमाई – निर्मात्यांनी जाहिर केलेल्या आकडेवारीनुसार, पहिल्याच दिवशी सिनेमाने 33.1 कोटींची कमाई केली. त्यानंतर सिनेमाच्या कमाईचा ग्राफ वाढतच राहिला. सिनेमाने पहिल्या आठवड्यात 225.28 कोटींचा गल्ला जमा केला.
‘छावा’ सिनेमाच्या दुसऱ्या आठवड्याची कमाई – दुसऱ्या आठवड्यात देखील सिनेमाने बॉक्स ऑफिस बक्कळ कमाई केली. दुसऱ्या आठवड्यात सिनेमाने 186 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्याची कमाई 411.46 इतकी आहे.
हेही वाचा – कालबद्ध कार्यक्रम राबविण्याची जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची सूचना
‘छावा’ सिनेमाच्या तिसऱ्या आठवड्याची कमाई – तिसऱ्या आठवड्यात सिनेमाच्या कमाईचा आकडा मंदावताना दिसला. तिसऱ्या दिवशी सिनेमाने 79.43 कोटींची कमाई केली.
‘छावा’ सिनेमाच्या आतापर्यंतच्या कमाईबद्दल सांगायचं झालं तर, सिनेमाने 20 दिवसांमध्ये 490.89 कोटींचा गल्ला जमा केलाय. तर 21 दिवसाच्या कमाईचे आकडे मिळवल्यास सिनेमाची कमाई 496.24 कोटीं झाली आहे. सिनेमा लवकरत 500 कोटींच्या घरात एन्ट्री करेल. पण सिनेमा ‘गदर 2’ सिनेमाचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल नाही.. हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. अभिनेता सनी देओल स्टारर ‘गदर’ सिनेमा 21 दिवसांमध्ये 525.7 कोटींची कमाई केली होती.
‘छावा’ सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित सिनेमाचं बजेट 130 कोटी होतं आणि सिनेमाने या रकमेच्या 4 पट अधिक कमाई केली आहे. सिनेमात अभिनेता विकी कौशल आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. तर संतोष जुवेकर, विनीत कुमार सिंह, अक्षय खन्ना आणि आशुतोष राणा यांनी देखील महत्त्वाची भूमिका साकारली आहे.




