#coronolockdown:लॉकडाऊनमुळे उत्तराखंडमध्ये अडकला अभिनेता मनोज बाजपेयी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/IMG_20200423_184548.jpg)
मुंबई : आज बॉलिवूड अभिनेता मनोज बाजपेयी आपला 51वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान, आपला यंदाचा वाढदिवस तो आपल्या घरी साजरा करू शकणार नाही. पण त्याला आनंद आहे की, यावेळी तो आपल्या कुटुंबासोबत आहे. दरम्यान, कोरोना व्हायरसचा वाढता प्रादूर्भाव पाहता, देशात अचानक लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे मनोज बाजपेयी सध्या उत्तराखंडमध्ये अडकला आहे.
मनोज बाजपेयी आपल्या पत्नी आणि मुलीसोबत उत्तराखंडमध्येच आहे. लॉकडाऊन सुरू होण्याआधी आपल्या आगामी वेब सीरिजच्या शुटिंगसाठी मनोज उत्तराखंड येथे गेला होता. यादरम्यान आपली मुलगी आणि पत्नीलाही त्याने काही दिवसांसाठी तिकडे बोलावून घेतलं होतं. परंतु, अचानक लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे ते तिघेही तिकडे अडकले आहेत.
यासंदर्भात मनोजने सांगितलं की, ‘मी माझ्या कुटुंबियांसोबत निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि यापेक्षा चांगली गोष्ट दुसरी काहीच असून शकत नाही.’ यादरम्यान, मनोजने लॉकडाऊन दरम्यान होणाऱ्या समस्यांबाबतही सांगितलं. तो म्हणाला की, यावेळी फक्त एकच समस्या आहे की, लोकांना आहे त्या ठिकाणाहून बाहेर जाण्याची परवानगी नाही. तसेच येथे एक घर दुसऱ्या घरापासून बऱ्याच अंतरावर आहे. त्यामुळे इतरांशी संपर्क होतच नाही.’
मनोज पुढे बोलताना म्हणाला की, त्याला स्वतःच्या आणि पत्नी नेहाच्या आई-वडिलांची फार काळजी वाटत आहे. त्याने सांगितलं की, या दोघांचे आई-वडिल दिल्लीमध्ये एकटे आहेत. आम्ही त्यांच्या संपर्कात आहोत आणि दिल्लीत असणाऱ्या आमच्या मित्रांनी त्यांच्या संपर्कात राहायला सांगितलं आहे.’
दरम्यान, मनोज बाजपेयी उत्तराखंडमध्ये आपला आगामी कॉमेडी चित्रपट ‘सूरज पे मंगल भारी’च्या शुटींग करत होता. या चित्रपटात मनोज बाजपेयीसोबत दिलजीत दोसांज आणि फातिमा सना शेखही दिसून येणार आहे.