breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनराष्ट्रिय

#Coronavirus: मुंबई पोलिसांसाठी ‘अक्षय कुमार’ पुन्हा एकदा सरसावला, दिले मनगटावर बांधणारे १ हजार बॅण्ड

देशावर ओढावलेल्या करोनाच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी सामान्य नागरिकांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण शक्य होईल तशी मदत करत आहे. यामध्ये अभिनेता अक्षय कुमार सातत्याने त्याच्या मदतीचा हात पुढे करत आहे. आतापर्यंत अक्षयने विविध मार्गांनी करोनाग्रस्तांना, महानगर पालिकेला , गरजुंना मदत केली आहे. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा मदतीचा हात पुढे केला आहे.

वृत्तानुसार, अक्षयने मुंबई पोलिसांना सेन्सॉर असलेले १ हजार मनगटावर बांधायचे हेल्थ बॅण्ड पुरवले आहेत. या बॅण्डच्या मदतीने पोलिसांच्या शरीराचं तापमान तपासता येणार आहे.

मनगटावर बांधण्यात येणाऱ्या या बॅण्डमुळे पोलिसांच्या शरीराचं तापमान, हृदयाचे ठोके, रक्तदाब, कॅलरी या सगळ्या गोष्टी तपासता येणार आहेत. सध्याच्या काळात पोलीस अहोरात्र काम करत असून बऱ्याच वेळा ते त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याच्या काळजीसाठी अक्षयने हे बॅण्ड पुरविल्याचं म्हटलं जात आहे.

दरम्यान, अक्षय सातत्याने त्याला शक्य होईल त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी त्याने पंतप्रधान केअर फंडमध्ये २५ कोटी रुपयांची रक्कम केली आहे. तर मुंबई महानगरपालिकेला तीन कोटी रुपयांची रक्कम डॉक्टरांच्या पीपीई (Personal protective equipment), मास्क आणि रॅपिड टेस्ट किट खरेदीसाठी दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button