ताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानच्या आईचं निधन

दोन आठवड्यांपूर्वीच त्यांचा 79 वा वाढदिवस साजरा

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड कोरिओग्राफर आणि दिग्दर्शिका फराह खानची आई मेनका इराणी यांचं शुक्रवारी मुंबईत निधन झालं. त्या 79 वर्षांच्या होत्या. मेनका या अभिनेत्री डेझी इराणी आणि हनी इराणी यांच्या बहीण होत्या. त्यांनी 1963 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बचपन’ या चित्रपटात काम केलं होतं. यामध्ये अभिनेता सलमान खानचे वडील सलीम खान यांनीसुद्धा भूमिका साकारली होती. मेनका यांनी निर्माते कामरान यांच्याशी लग्न केलं. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. रुग्णालयात त्यांच्यावर उपचारसुद्धा सुरू होते. मात्र त्या पूर्णपणे बऱ्या होऊ शकल्या नव्हत्या. काही दिवसांपूर्वी खुद्द फराह खानने तिच्या व्लॉगमध्ये याविषयीची माहिती दिली होती. दोन आठवड्यांपूर्वीच त्यांनी 79 वा वाढदिवस साजरा केला होता.

आईच्या वाढदिवसानिमित्त फराहने सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली होती. आईसोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं होतं, ‘आपण सर्वजण आपल्या आईला फार गृहित धरतो, खासकरून मी. या महिनाभराच्या काळात मला समजलं की मी माझ्या आईवर किती प्रेम करते. मी माझ्या आयुष्यात इतक्या खंबीर आणि साहसी व्यक्तीला पाहिलं नाही. अनेक शस्त्रक्रिया होऊनही त्यांची विनोदबुद्धी कायम होती. वाढदिवसाच्या शुभेच्छा आई. घरी परत येण्यासाठी आजचा दिवस खूप चांगला आहे. माझ्यासोबत पुन्हा लढण्यासाठी तू लवकरात लवकर तयार होशील अशी आशा करते. आय लव्ह यू!’

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button