नंगटपणा करणारी बाई म्हणत उर्फी जावेदवर भडकल्या चित्रा वाघ
![Chitra Vaughan lashed out at Urfi Javed, calling her a naked woman](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/12/chitra-wagh-and-urfi-javed-780x470.jpg)
चित्रा वाघ यांनी केली मुंबई पोलिसांकडे अटकेची मागणी
मुंबई : उर्फी जावेद तिच्या अतरंगी कपड्यांमुळे कायम वादाचा विषय ठरत आहे. आताही भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी तिच्या याच अतरंगी कपड्यांच्या स्टाईल वरून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदला नंगटपणा करणारी बाई म्हणत त्यांनी तिच्या अटकेची मागणी केली आहे.
अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तत्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवतआहे, असे ट्वीट चित्रा वाघ यांनी केले आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी मुंबई पोलिसांनादेखील टॅग केले आहे.
आपल्या विचित्र फॅशनमुळे उर्भी जावेद नेहमीच चर्चेत असते. तिने फॅशन म्हणून परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यांची सोशल मीडिया तसेच माध्यमांकडून दखल घेतली जाते. याच विचित्र फॅशन सेन्समुळे तिला काही लोकांकडून टोकाचा विरोधही केला जातो. विचित्र वाटणारे वस्त्र परिधान करू नयेत, असा सल्ला अनेकजण तिला देतात. तर काही जण तिच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी करत आहेत.