breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

सलमान खानला मंबई उच्च न्यायालयाचा दिलासा; पत्रकाराच्या मारहाणप्रकरणी तक्रार रद्द

सलमान खानला अंधेरी न्यायालयात हजर राहावे लागणार नाही

Salman khan : बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्याविरोधात दाखल तक्रार उच्च न्यायालयाने गुरूवारी रद्द केली आहे. २०१९ मध्ये पत्रकाराला मारहाण आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खान विरोधात दाखल करण्यात आलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले. त्यामुळे सलमान खानला अंधेरी न्यायालयात हजर राहावे लागणार नाही.
सलमान खान सायकल चालवत असताना त्याचे चित्रीकरण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सलमान आणि त्याचा अंगरक्षक नवाज शेखने शिवीगाळ व मारहाण केली, असा आरोप स्थानिक पत्रकार अशोक पांडे यांने अंधेरी न्यायालयात तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने सलमान व त्याच्या अंगरक्षकाला समन्स बजावून ५ एप्रिलला हजर राहण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान, सलमान खान याच्या याचिकेवरील निर्णय राखून ठेवण्यापूर्वी युक्तीवादाच्या वेळी पोलिसांत तक्रार नोंदवताना आणि नंतर दंडाधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदवताना सलमान याने आपला फोन हिसकावल्याचे, तर दंडाधिकाऱ्यांसमोरील तक्रारीत मात्र मारहाण केल्याचे पांडे यांनी म्हटले होते. दोन महिन्यांची तक्रार करण्याच्या पांडे यांच्या भूमिकेवरही न्यायालयाने प्रश्न उपस्थित केला होता. दंडाधिकाऱ्यांनी सलमान याला समन्स बजावताना कायदेशीर प्रक्रियेचे योग्य चे पालन केले नाही, असंही न्यायालयाने महटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button