Israel-Palestine Crisis : इस्त्रायलमध्ये अडकली प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री
![Bollywood actress Nusrat Bharu got stuck in Israel](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/nushrat-bharucha-780x470.jpg)
Israel-Palestine Crisis : इस्लामी कट्टरवादी गटाने अचानक इस्त्रायलवर हल्ला केला आहे. यामुळे संपूर्ण जग हादरलं आहे. हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलने देखील गाझामध्ये अनेक हवाई हल्ले केले. यामध्ये मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. दरम्यान, या युद्धजन्य परिस्थिती असलेल्या इस्त्रायलमध्ये बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अडकल्याचं समोर आलं आहे.
बॉलीवूड अभिनेत्री नुसरत भरूचा इस्त्रायलमध्ये अडकली आहे. दुर्दैवाने नुसरत इस्त्रायलमध्ये अडकली आहे. ती तिथे हैफा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी गेली होती, अशी माहिती तीच्या टीममधील एका सदस्याने दिली आहे.
हेही वाचा – राष्ट्रवादीच्या असंघटित कामगार विभाग प्रदेशाध्यक्षपदी काशिनाथ नखाते
नुसरतच्या टीमने तिच्याशी शेवटचा संपर्क शनिवारी, दुपारी १२.३० केला होता. तेव्हा ती बेसमेंटमध्ये सुरक्षित होती. पण तेव्हापासून नुसरतशी पुन्हा संपर्क होत नाहीये. तिच्याशी संपर्क साधण्यासाठी आणि तिला सुरक्षित भारतात परत आणण्यासाठी टीमकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.