बिहारमधील सीजेएम कोर्टात शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल
कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचं उद्घाटन, वाहतूक कोंडी झाली,1 नोव्हेंबर रोजी सुनावणी
बिहार : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कायम तिच्या सिनेमांमुळे आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. शिल्पा बॉलिवूडपासून दूर असली तरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. पण आता शिल्पा कायद्या कचाट्यात अडकली आहे. एका व्यक्तीने अभिनेत्रीवर तक्रार दाखल केली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील सीजेएम कोर्टात शिल्पा शेट्टीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिल्पा हिच्यासोबत अन्य चार जणांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आली. अधिवक्ता सुधीर ओझा यांनी शिल्पा आणि इतर 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
नक्की प्रकरण आहे तरी काय?
सुधीर ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिल्पा शेट्टी हिच्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती आणि या कोंडीमध्ये अनेक जण अडकले होते. एका कार्यक्रमासाठी अभिनेत्रीला प्रमुख पाहुणी म्हणून बोलवण्यात आलं होतं. ओझा म्हणाले, प्रशासनाकडून जाणीवपूर्वक वाहतून कोंडी करण्यात आली. मुझफ्फरपूरमधील कलाम बाग चौकाजवळ कल्याण ज्वेलर्सच्या शोरूमचं उद्घाटन होतं , जिथे अभिनेत्रीला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. शिल्पाच्या येणार असल्याची माहिती मिळताच तेथे नागरिकांची मोठी गर्दी झाली.
प्रशासकीय पातळीवर कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी दिल्याचं सुधीर ओझा यांनी सांगितले. वर्दळीचा मार्ग असल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागला. कार्यक्रमादरम्यान ट्रॅफिक सिग्नलही बंद ठेवण्यात आले होते, त्यामुळे लोकांना अधिक त्रास झाला. वाहतूक कोंडीत अडकल्याने अनेकांची महत्त्वाची कामे हुकली. शिवाय वाहतून कोंडीमध्ये अडकल्यामुळे माझी प्रकृती देखील खालावली, असं देखील ओझा म्हणाले.
दरम्यान, शिल्पा हिची एक झलक पाहण्यासाठी शोरुम बाहेर अनेकांची गर्दी जमली. संपूर्ण रस्त्यावर गर्दी जमली होती. याच कारणामुळे वकिलांनी शिल्पा हिच्यासोबत अन्य 4 जणांवर देखील गुन्हा दाखल केला आहे. एका खासगी कार्यक्रमामुळे अनेक तास वाहतून कोंडी ढाली होती. ज्यामुळे लोकांना त्रास सहन करावा लागला.
शिल्पाव्यतिरिक्त उर्वरित चार लोकांमध्ये मुझफ्फरपूरचे जिल्हा अधिकारी सुब्रत कुमार सेन, कल्याण ज्वेलर्स आस्थापनेचे संस्थापक टीएम कल्याण आणि कार्यकारी संचालक रमेश कल्याण यांचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे.