बिग बॉस मराठी ३ : सुरेखा कुडची घराबाहेर!
![Bigg Boss Marathi 3: Surekha Kud is out of the house!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/10/Surekha-Kudachi.jpeg)
मुंबई – ‘बिग बॉस मराठी सिझन ३’च्या मागील आठवड्यात सुरेखा कुडची, संतोष चौधरी (दादुस), विशाल निकम, तृप्ती देसाई, विकास पाटील, सोनाली पाटील, मीनल शाह आणि स्नेहा वाघ हे घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले होते. या आठ जणांमधून कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. शेवटी रविवारी स्नेहा वाघ आणि सुरेखा कुडची डेंजर झोनमध्ये होत्या आणि महेश मांजरेकर यांनी घोषित केले की, या आठवड्यात सुरेखा कुडची यांना बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जावे लागले. हे ऐकताच तृप्ती देसाई, स्नेहा, जय आणि घरातील इतर सदस्यांना अश्रू अनावर झाले. त्यानंतर महेश मांजरेकर यांनी सुरेखा ताईंना विशेष अधिकार दिला. त्याप्रमाणे त्यांनी तृप्ती देसाई यांना या आठवड्यात घराचे कॅप्टन बनवले.
सुरेखा कुडची म्हणाल्या, ‘या घरात माणूस म्हणून कोणीच वाईट नाही. परिस्थितीमुळे होतं तसं पण, मी ठरवलं होतं जेव्हा मी एलिमनेट होईन तेव्हा मी रडणार नाही पण या घरात काहीतरी जादू आहे.’ असे म्हणत सुरेखा कुडची घरातून बाहेर पडल्या.
दरम्यान, आता येत्या आठवड्यामध्ये सदस्यांना कोणते टास्क मिळणार? कोण घराचा नवा कॅप्टन बनेल? कोण नॉमिनेट होईल? प्रेक्षकांचे मत कोणाला वाचवेल? आणि कोण घराबाहेर जाईल? हे पाहणे रंजक असणार आहे. पाहत राहा बिग बॉस मराठी सिझन ३ सोमवार ते रविवारी रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर.