बिग बॉसला मिळाले यंदाचे टॉप ५ फायनलिस्ट! कधी आणि कुठे पाहता येणार?
![Bigg Boss got this year's top 5 finalists](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/01/Bigg-Boss-17-1-780x470.jpg)
Bigg Boss 17 | बिग बॉस १७ या रिअॅलिटी शोची सर्वांना उत्सुकता आहे. या रिअॅलिटी शोची वाटचाल आता ग्रँड फिनालेकडे होत आहे. अशातच बिग बॉस १७ला आता टॉप 5 स्पर्धक मिळाले आहेत. नुकतंच शोमधून अंकीता लोखंडेचा पती विकी घराबाहेर गेला. त्यामुळे आता बिग बॉस १७च्या ग्रँड फिनालेची उत्सुकता शिगेला आहे.
बिग बॉस १७ या शोमध्ये अभिषेक कुमार, मन्नारा चोप्रा, मुनावर फारुकी, अरुण मशेट्टे आणि अंकिता लोखंडे हे टॉप ५ स्पर्धक फिनालेमध्ये दाखल झाले आहेत.
हेही वाचा – पंतप्रधान मोदींची नवीन घोषणा! एक कोटी घरांवर सोलर सिस्टीम बसवण्यात येणार
🚨 Bigg Boss 17 Week-14 Contestants Popularity Ranking (TOP-5 Most Loved)
1. #MunawarFaruqui (Winner)
2. #AnkitaLokhande (Runner-up)
3. #AbhishekKumar (2nd Runner-up)
4. #MannaraChopra
5. #ArunMashetteyComments – Who will WIN the show?
(Based on Nos. of Likes on a poll)… pic.twitter.com/3rWHcrK8RY
— #BiggBoss_Tak👁 (@BiggBoss_Tak) January 21, 2024
कलर्स चॅनलवर रविवारी २८ जानेवारी रोजी BB-१७ ग्रँड फिनाले प्रसारित होणार आहे. हा ग्रँड फिनाले संध्याकाळी ६ वाजता सुरू होईल आणि मध्यरात्री १२ च्या दरम्यान विजेत्याचे नाव घोषित केले जाईल. याशिवाय प्रेक्षकांना हा फिनाले JioCinema वर पाहता येईल.