गोवा शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलमध्ये सेकंड ओपिनियन लघुपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह ऍक्शन फिल्म पुरस्कार
आपल्या खिशाला परवडेल अशा रीतीने सुद्धा उपचार होऊ शकतो आणि याचीच महती सांगणारा लघुपट
![Goa, Short Film, Festival, Second Opinion, Short Film, Best, Live Action, Film Awards,](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/11/harshal-Alpe-780x470.jpg)
पुणेः यंदाच्या दहाव्या गोवा लघुपट महोत्सवात पुण्याच्या हर्षल आल्पे लिखित आणि दिग्दर्शित आणि मनीषा चंद्रशेखर आल्पेनिर्मित ‘सेकंड ओपिनियन’ या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लाईव्ह अॅक्शन फिल्म हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हे पारितोषिक वितरण जेष्ठ लेखक, समीक्षक श्रीकांत कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. साधारणपणे सर्वसामान्य मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय बहुतांश वेळा सरकारी दवाखान्याच्या बाबतीत जरा नाकच मुरडतात गंभीर आजाराच्या उपचारासाठी सांगितलेला खर्च भागवण्यासाठी वाटेल ते करतात, पण, सरकारी दवाखान्यात सुद्धा आपल्या खिशाला परवडेल अशा रीतीने सुद्धा उपचार होऊ शकतो आणि याचीच महती सांगणारा लघु चित्रपट म्हणजे “सेकंड ओपिनियन”
आयुष्यात प्रत्येकच बाबतीत सेकंड ओपिनियन घेणं फार महत्त्वाचं आहे.
या लघु चित्रपटाचे कार्यकारी निर्माता श्रीपाद दीक्षित आणि श्री संजय हिरवे आहेत. तर संकलन वज्रांक चारूदत्त आफळे यांनी केले तर या लघु चित्रपटाचे छायांकन अभिषेक धल्गडे यांनी केले आहे. तर निखिल परदेशी यांनी कथा साहाय्य केले आहे
या लघु चित्रपटात पात्रांना मेकअप प्राजक्ता जोशी यांनी केला आहे. या लघु चित्रपटाचे डबिंग पार्टनर्स आहेत कॉस्मिक बीट्स स्टुडिओ पुणे आणि मीडिया क्युरा पुणे तर या लघु चित्रपटातील मुख्य कलाकार आहेत स्मिता कुलकर्णी, अनुप जोशी, सुशील पाटील, डॉ. रवींद्र तुळपुळे आणि संजय हिरवे तसेच समीर बुधकर यांच्या मुख्य भूमिका आहेत.
हा पुरस्कार स्वीकारताना लेखक दिग्दर्शक हर्षल आल्पे यांच्यासह सुदिन कलामंचचे प्रमुख पंडित विनोदभूषण आल्पे हे ही उपस्थित होते. सुदिन कलामंच या संस्थेने या लघुपटाची निर्मिती केली आहे. पणजी येथील संस्कृती भवन येथे हा सोहळा पार पडला .यंदा अनेक दर्जेदार लघुपट यामध्ये समाविष्ट होते .शंभरहून अधिक लघुपटांचे प्रदर्शन महोत्सवामध्ये करण्यात आले.अनेक विभागांमध्ये ४० पारितोषिके यावेळी गौरवित करण्यात आल्याचे या गोवा शॉर्ट फिल्म फेस्टीवल चे संचालक योगेश बारस्कर यांनी सांगितले.
तसेच फिल्मला मिळालेला पुरस्कार स्वीकारताना हर्षल आल्पे म्हणाले, ” हा कुण्याएकट्याचा गौरव नसुन संपूर्ण संघाने दिवस रात्र घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. तसेच अनुप जोशी, समीर बुधकर,स्मिता कुलकर्णी, सुशील पाटील, आणि विशेष उल्लेख श्रीपाद दिक्षित, संकलक वज्रांग आफळे, डॉ. रविंद्र तुळपुळे आणि संजय हिरवे या सर्व कलाकारांचे ही हे यश आहे की त्यांनी मला उत्तम साथ दिली. याबद्दल मी सर्वांचाच आजन्म ऋणी राहिन.