breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
सर्वोत्कृष्ट अभिनेता शाहरुख, तर अभिनेत्री राणी मुखर्जी; पहा विजेत्यांची संपूर्ण यादी
IIFA Awards 2024 | अबू धाबीमध्ये हिंदी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात मोठा अवॉर्ड शो आयफा 2024 पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या वर्षभरात प्रदर्शित झालेल्या बॉलिवूड चित्रपटांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. शाहरुख खानपासून राणी मुखर्जीपर्यंत अनेक कलाकारांना हा पुरस्कार मिळाला आहे.
कोणाला कोणते पुरस्कार मिळाले?
- सर्वोत्कृष्ट अभिनेता : शाहरुख खान (जवान)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : राणी मुखर्जी
- सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : विधु विनोद चोप्रा
- सर्वोत्कृष्ट चित्रपट : अॅनिमल
- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : शबाना आजमी
- सर्वोत्कृष्ट खलनायकाची भूमिका : बॉबी देओल
हेही वाचा – देशी गायी ‘राजमाता-गोमाता’ म्हणून घोषित; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
- सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : प्रीतम, विशाल मिश्रा, मानव भारद्वाज, श्रेयस पुराणिक, जानी, भूपिंदर बब्बाल, अशीम केमसन, हर्षवर्धन रामेश्वर
- सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (पुरुष) : भूपिंदर बब्बाल, अर्जन वेल्ले
- सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर (स्त्री) : शिल्पा राव
स्पेशल अवॉर्ड्स :
- भारतीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरी : हेमा मालिनी
- डेब्यूटंट ऑफ द इयर : अलिजेह अग्निहोत्री
- सर्वोत्कृष्ट पटकथा : इशिता मोइत्रा, शशांक खेतान, सुमित रॉय
- सर्वोत्कृष्ट गाणं : सिद्धार्थ सिंग आणि गरिमा वहल – सतरंगा
- चित्रपटांमध्ये 25 वर्ष उत्कृष्ट कामगिरी : करण जोहर