परिणिती चोप्राचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
१३ व्या वर्षी या टीव्हीशोमध्ये झळकली होती परिणिती चोप्रा, व्हिडिओ पाहून चाहतेही सैराट
![An old video of Parineeti Chopra has gone viral on social media](https://mahaenews.com/wp-content/uploads/2024/05/parinita-Chopra-780x470.jpg)
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री परिणिती चोप्रा हिच्या ‘चमकीला’ या चित्रपटाची चर्चा सुरू आहे. सिनेमा प्रदर्शित होताच परिणितीचं प्रचंड कौतुक केलं जात आहे. कधीही न पाहिलेला परिणितीचा अंदाज या चित्रपटात तिच्या चाहत्यांना पाहायला मिळाला आहे. पण सध्या परिणिती एका वेगळ्याच कारणामुळं चर्चेत आहे. परिणितीचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
‘इशकजादे’ या सिनेमातून परिणितीनं सिनेइंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. या सिनेमातल्या अभिनयासाठी तिचं कौतुकही झालं. पण खूप कमी जणांना माहिती आहे की, ती या पूर्वीही एकदा टीव्ही शोमध्ये झळकली होती. परिणितीनं स्वत: या शोचा व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला आहे. परिणिती १३ वर्षांची असताना तिनं दूरदर्शनवरच्या एका कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या शोमध्ये गाणं गाताना दिसतेय.
परिणितीनं शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्यांनी या व्हिडिओ लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. या व्हिडिओत ती ग्रुपमध्ये ‘तन मन से अपने देश की सेवा’ हे गाणं गाताना दिसतेय. हा व्हिडिओ शेअर करत तिनं लिहिलं आहे की, ‘माझं खरं पदार्पण’.
व्हिडिओ पाहून तिच्या चाहत्यांनी वेगवेगळ्या कमेंट्स केल्या आहेत. कोणी तिच्या लुकबद्दल बोलतयं तर कोणी तिच्या गाण्याबद्दल.
अनेक सिनेमांना नकार दिला
दरम्यान, परिणिती चोप्रा हिला गेल्या अनेक दिवसांपासून वाढलेल्या वजनावरून ट्रोल केलं जात होतं. तिचं लग्न झाल्यानंतर अचानक वजन वाढल्यानं ती गरोदर असल्याच्या चर्चाही अनेकदा झाल्या होत्या. एक पोस्ट शेअर करत आपण गरोदर नसल्याचं तिनं जाहीरही केलं होतं. मात्र, वजन कशासाठी वाढवलं हे सांगितलं नव्हतं.
परिणितीचा ‘चमकिला’ हा सिनेमा आल्यावर सगळ्यांना तिच्या वाढलेल्या वजनामागचं कारण कळालं. या सिनेमातल्या भूमिकेसाठी परिणितीनं एक दोन किलो नव्हे तर तब्बल १६ किलो वजन वाढवलं होतं. या वाढत्या वजनानं अनेक प्रोजेक्टववर पाणी सोडावं लागल्याचं परिणितीनं सांगितलं. एका मुलाखतीत ती म्हणाली की, ‘कलाकारांवर लोक बारीक लक्ष ठेवून असतात. माझं वजन वाढललं पाहिल्यावर लगेचच प्रेग्नंट असल्याची अफवा पसरली. हे वजन मी भूमिकेसाठी वाढवलं होतं. या दरम्यान मला अनेक प्रोजेक्टस ऑफर झाले. मात्र, माझं वाढलेलं वजन पाहून या भूमिका मी करू शकणार नव्हते. वजन कमी करून शूटिंगला जाण्याइतका वेळही नव्हता. या कारणामुळं मला हे प्रोजेक्ट्स सोडावे लागले. काही गोष्टी कलाकारांच्या हाती नसतात.’ असंही परिणिती म्हणाली.