breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमनोरंजन
Pushpa 2 : अल्लू अर्जूनच्या ‘पुष्पा 2’ टीझर प्रदर्शित
Pushpa 2 : दक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जून मुख्य भूमिकेत असलेल्या ‘पुष्पा : द राइज’ या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकुळ घातला होता. यानंतर आता मोठ्या प्रतीक्षेनंतर ‘पुष्पा 2’ मधील अल्लू अर्जूनची पहिली झलक समोर आली आहे.
पुष्पा सुपरहिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी प्रेक्षक खूप उत्सुक होते. तर ही उत्सुकता आणखी वाढवण्यासाठी या चित्रपटाची एक झलक चाहत्यांना दाखवली आहे. यामध्ये पुष्पा तिरीपती तुरूंगातून फरार असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर टीझर ७ मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.
अल्लू अर्जूनच्या डॉशिंग स्टाईलने पुष्पाचा शेवट करण्यात आला होता. त्यामुळे चित्रपटाच्या पुढील भागात पोलिस आणि पुष्पा यांच्यातील संघर्ष पाहायला मिळणार आहे.