breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

आलिया भट्ट होम क्वारंटाईन असताना पोहोचली दिल्लीत! कारवाई होणार?

मुंबई – कोरोना नियमावलीचे उल्लंघन करून दिल्लीला गेल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यावर मुंबईत येताच कारवाई होण्याची शक्यता आहे. बॉलिवूड निर्माता करण जोहरच्या घरी एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीत आलिया भट्टही सहभागी झाली होती. आलिया भट्टचा कोरोना अहवाल निगेटिव्ह होता. मात्र तिला होम क्वारंटाईन होण्यास सांगितले होते. परंतु आलिया भट्टने या नियमावलीला केराची टोपली दाखवली. त्यामुळे होम क्वारंटाईनचे उल्लंघन केल्याप्रकरणी तिच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. आलिया आज रात्री चार्टर विमानाने दिल्लीहून मुंबईला परतणार आहे. मुंबईत येताच पालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी तिच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. कभी खुशी कभी गम चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने करण जोहरने घरी एका छोट्याशा पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीत आलिया भट्ट, करीना कपूर, अमृता अरोरा, महिप कपूर, सीमा खान यांच्यासह अन्य अभिनेत्री सहभागी झाल्या होत्या. पार्टीनंतर करीना कपूर, सीमा खान, अमृता अरोरा, महिप कपूर या अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. तर आलिया भट्टची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मात्र तिला होम क्वारंटाईन करण्यात आले होते.

दरम्यान, संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली. तसेच सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली. तर अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूर आणि त्यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button