RRR च्या यशानंतर राम चरणच्या पुढील चित्रपटाची घोषणा
राम चरण आणि कियारा अडवाणी दिसणार एकत्र
![After the success of RRR, Ram Charan's next film is announced](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/03/game-changer-ram-charan-780x470.jpg)
Game Changer : दाक्षिणात्य सुपरस्टार रामचरणचा आज वाढदिवस असून आता तो देशभर त्याच्या ‘आरआरआर’ या चित्रपटामुळे प्रसिद्ध झाला आहे. आज रामचरण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करतोय. आपल्या वाढदिवशी रामचरणने आपल्या नव्या सिनेमाचं नाव व टायटल टीझर रिलीज करत चाहत्यांना गिफ्ट दिलं आहं.
रामचरणच्या या सिनेमात बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे सध्या शूटींग सुरू होते. या चित्रपटाचं तात्पुरतं नामकरण ‘RC 15’ असं करण्यात आलं होतं. पण आता या चित्रपटाच्या नावाची घोषणा झाली आहे. रामचरण व कियाराच्या या बहुप्रतिक्षीत चित्रपटाचं नाव ‘गेम चेंजर’ असं ठेवण्यात आलं आहे.
राम चरणने एक टीझरही शेअर करत सोशल मीडियावर “हा गेम चेंजर आहे!!!!”, असं कॅप्शन देत चित्रपटाच्या नावाचा खुलासा केला आहे. ‘गेम चेंजर’ एक पॉलिटिकल ॲक्शन थ्रिलर सिनेमा आहे. या चित्रपटात राम चरण डबलरोलमध्ये दिसण्याची शक्यता आहे. हिंदीशिवाय तामिळ व तेलगू भाषेत प्रदर्शित होणारा ‘गेम चेंजर’ या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला रिलीज होण्याची अपेक्षा आहे.
राम चरण आणि कियारा अडवाणी यांच्याशिवाय या चित्रपटात अंजली, समुथिराकणी, एसजे सूर्या, श्रीकांत, सुनील यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एस. शंकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. याआधी विक्रम, शिवाजी, रोबोट असे सिनेमे त्यांनी बनवले आहेत. एस. शंकर हे साऊथचे महागडे दिग्दर्शक म्हणून ओळखले जातात. जबरदस्त व्हीएफक्स इफेक्ट्साठी त्यांचे सिनेमे ओळखले जातात. गेम चेंजरच्या टायटल टीझरमध्येही जबरदस्त व्हीएफएक्सची झलक पाहायला मिळते.