‘आदिपुरूष’ महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, भाजपाच्या राम कदमांचा इशारा
!['Adipurush' will not be released in Maharashtra, BJP's Ram Kadam warns](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/10/adipurush-ram-kadam-780x461.jpg)
मराठमोळा दिग्दर्शक ओम राऊत याच्या आदिपुरुष या चित्रपटाची सातत्याने चर्चा सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता प्रभास, सैफ अली खान यांची मुख्य भूमिका पाहायला मिळत आहे. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. यानंतर अनेकांनी या चित्रपटाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. काही नेटकऱ्यांनी या कलाकारांच्या लूकबद्दलही खिल्ली उडवली आहे. तर काहींनी या चित्रपटाच्या व्हीएफएक्सबाबत टीका केली आहे. पण आता या चित्रपटाला राजकीय नेत्यांकडून विरोध होताना दिसत आहे. भाजप नेते राम कदम यांनी या चित्रपटाला कडाडून विरोध केला आहे. ‘आदिपुरूष’ हा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही, अशा इशारा भाजप नेते राम कदम यांनी दिला आहे.
राम कदम यांनी नुकतंच एक ट्वीट केले आहे. यात त्यांनी आदिपुरुष या चित्रपटाला कडाडून विरोध दर्शवला आहे. “आदिपुरुष चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही. या चित्रपटात निर्मात्यांनी पुन्हा एका किरकोळ प्रसिद्धीसाठी आमच्या देवी देवतांचं विडंबन करू कोट्यवधी हिंदू लोकांच्या श्रद्धा आणि आस्थेला ठेच पोहोचवली आहे. आता वेळ आली आहे… या विडंबनाचा फक्त माफीनामा.”, असे राम कदम म्हणाले.
दरम्यान आदिपुरुष हा चित्रपट येत्या १२ जानेवारी २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट विविध ५ भाषांमध्ये प्रदर्शित होईल. या चित्रपटाची कथा रामायणावर आधारित आहे. याचे बजेट ५०० कोटी असल्याचे बोललं जात आहे. याचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून अनेकांनी यावर चांगल्या वाईट प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच अनेकांनी हा चित्रपट बॉयकॉट करा अशी मागणीही केली आहे.
#आदिपुरुष फिल्म को महाराष्ट्र के भूमी प्रदर्शित नही होने देंगे#आदिपुरुष फिल्म मे पुनः एक बार फिल्म निर्माताओ ने ओछी पब्लिसिटी पाने के लिये हमारे #देवी #देवताओ विडंबन करके कराडो करोडो हिंदू लोगो की श्रद्धा और आस्था को आहत किया.
— Ram Kadam (@ramkadam) October 6, 2022
अब समय आ गया है .. केवल माफीनामा या विडंबन का