कचऱ्यात सापडलेल्या मुलीला अभिनेत्री स्वरा भास्करने घेतलं दत्तक!
![Actress Swara Bhaskar adopts girl found in garbage!](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/04/Swara-Bhaskar.jpg)
मुंबई – अभिनेत्री स्वरा भास्कर ही आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळं नेहमी चर्चेत असते. मात्र यावेळी स्वरानं केलेल्या एका कृतीसाठी तिचं सर्व स्तरातून कौतुक केलं जात आहे. आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगच्या निमित्तानं स्वरा उत्तर प्रदेशमधील बदायु येथे गेली होती. त्यावेळी तिनं तेथील एका अनाथ आश्रमाला भेट दिली आहे.
आश्रमातील एका मुलीची कथा ऐकून स्वरा अत्यंत भावूक झाली. कारण ही मुलगी त्या अनाथआश्रमाच्या संचालिका प्रियांका जौहरी यांना एका कचऱ्याच्या डब्यात सापडली होती. यानंतर या मुलीला दत्तक घेण्याचा निर्णय स्वरानं घेतला आहे.
ही मुलगी पुढील काही काळ अनाथआश्रमात राहील परंतु तिचा संपूर्ण आर्थिक खर्च स्वरा भास्कर उचलणार आहे. ही मुलगी थोडी मोठी होईल त्यावेळी स्वरा तिला आपल्या घरी घेऊन जाणार असल्याचं कळतंय.
दरम्यान, देशात सुरू असलेल्या विविध घटनांवर रोखठोक भाष्य करताना दिसते. ती सोशल मी़डियावर चांगलीच सक्रिय आहे. स्वरा अनेकदा तिच्या रोखठोक मतांमुळे सोशल मीडियावर ट्रोल होते. मात्र स्वराने केलेल्या या तिचं कौतुक केलं जात आहे.