ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिनेत्री सोनाक्षीचे वक्तव्य,भावामुळे नाही केलं थाटात लग्न

दुसरा भाऊ सुध्दा लग्नात नव्हता, कुटुंबात नाराजीचं वातावरण

मुंबई: अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इक्बाल यांनी सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. नुकताच, सोनाक्षी आणि झहीर यांनी रजिस्टर्ड पद्धतीत लग्न केलं आणि सेलिब्रिटींसाठी पार्टी देखील ठेवली होती. दोघांच्या लग्नाचे आणि पार्टीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. अशात सोनाक्षी हिने थाटात लग्न का केलं नाही? असा प्रश्न अनेकदा विचारण्यात आला. यावर नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मौन सोडलं आहे. भाऊ कुश सिन्हा याच्यामुळे थाटात लग्न केलं नाही… असं वक्तव्य सोनाक्षी हिने केलं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सोनाक्षी हिची चर्चा रंगली आहे.

नुकताच झालेल्या मुलाखतीत सोनाक्षी सिन्हा म्हणाली, मोठ्या थाटात लग्न करण्याचा दबाव आमच्यावर देखील होता. पण आम्हाला कसं लग्न करायचं आहे. या सर्व गोष्टी आम्ही ठरवलेल्या होत्या. माझा भाऊ कुश याचं लग्न फार थाटात झालं होतं. लग्नाच्या प्रत्येक कार्यक्रमात 5 ते 8 हजार लोकं उपस्थित होते. मी तेव्हाच माझ्या आई – वडिलांना सांगितलं होतं की माझं लग्न असं होणार नाही,असं अभिनेत्री म्हणाली.

सोनाक्षीच्या भावाच्या लग्नाबद्दल सांगायचं झालं तर, 2015 मध्ये कुस याने तरुणा अग्रवाल हिच्यासोबत लग्न केलं. दोघांचं लग्न मोठ्या थाटात झालं. लग्नात अनेक दिग्गज व्यक्ती आणि सेलिब्रिटी देखील उपस्थित होते. लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

स्वतःच्या लग्नाबद्दल कायम म्हणाली सोनाक्षी?

सोनाक्षी म्हणाली, ‘आपल्या आयुष्यात हे क्षण फक्त एकदाच येतात. त्यामुळे मला माझ्या आयुष्यातील या क्षणांना आणखी खास करायचं होतं. त्यामुळे आम्हाला हवं होतं तसं लग्न आम्ही केलं. काही मित्र होते जे नाराज होते. त्यांना लग्नातील सर्व कार्यक्रम हवे होते. माझा मित्र मोहित स्टायलिस्ट आहे. त्याला वाटत होतं मी लग्नात पाच वेळा कपडे बदलावे. पण मी फक्त एकदाच लूक बदलला. ज्यामुळे तो नाराज झाला होता, असं देखील सोनाक्षी म्हणाली.

सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, सात वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न केलं. रिसेप्शन सोहळ्यात अभिनेत्रीचा भाऊ कुश सहभाही होता. पण भाऊ लव मात्र बहिणीच्या लग्नात नव्हता. दरम्यान, सोनाक्षी मुस्लीम मुलासोबत लग्न करत आहे, त्यामुळे सिंहा कुटुंबात नाराजीचं वातावरण आहे. अशी देखील चर्चा रंगली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button