अभिनेत्री शिल्पा शेट्टीची उच्च न्यायालयात धाव
![Actress Shilpa Shetty's move to the High Court](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/shilpa-shetty-780x470.jpg)
रिचर्ड गेरे चुंबन प्रकरणात गुन्हा रद्द करण्याची मागणी
मुंबई : अभिनेत्री शिल्पा शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेता रिचर्ड गेरे याने 2007 मध्ये एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये तिचे सार्वजनिकपणे चुंबन घेतल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरुद्ध अश्लीलतेचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिल्पा शेट्टीने गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहे.
न्यायालयाने महाराष्ट्र सरकार आणि तक्रारदाराला उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. सहआरोपी हॉलीवुड अभिनेता रिचर्ड गेरे याने तिचे जाहीर चुंबन घेतलेल्या घटनेत शिल्पा शेट्टी वर अश्लीलता आणि असभ्यता पसरण्याचा आरोप करण्यात आला होता. 15 एप्रिल 2007 रोजी बाह्य दिल्लीतील संजय गांधी ट्रान्सपोर्ट नगर येथे एड्स जनजागृती मोहिमेदरम्यान, शिल्पा शेट्टीने रिचड गेरेला स्टेजवर नेले जेव्हा त्याने तिचा हात धरला, तिला मिठी मारली आणि तिच्या गालावर चुंबन घेतले होते. जयपूर, अलवर आणि गाझियाबाद येथे काही सार्वजनिक सदस्यांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केल्याने या घटनेने वाद निर्माण झाला.
2011 मध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सर्व प्रकरणे एकत्र करून मुंबईला स्थानांतरित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर दोन तक्रारी अखेर मुंबईच्या बॅलार्ड पिअर मॅजिस्ट्रेट न्यायालयात वर्ग करण्यात आल्या होते. सविस्तर सुनावणीनंतर शिल्पाला मुंबईतील दंडाधिकारी न्यायालयाने एका प्रकरणात दोषमुक्त केले. दुसर्या प्रकरणात हे समन्स ट्रायबल केस आहे. त्यामुळे डिस्चार्जची तरतूद नाही या कारणास्तव न्यायालयाने तसे करण्यास नकार दिला.
दुसऱ्या प्रकरणात ज्यामध्ये दंडाधिकार्यांनी तिला डिस्चार्ज देण्यास नकार दिला होता त्या आदेशाला आव्हान देत तिने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती आरजी अवचट खंडपीठासमोर वकील मधुकर दळवी यांनी असा युक्तिवाद की 2007 च्या घटनेचा व्हिडिओ पाहिल्यास शिल्पा शेट्टीचा कोणताही अश्लील कृत्य करण्याचा हेतू होता असे कोणत्याही कल्पनेने समजू शकत नाही.