अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी केलं अटक
![Actress Rakhi Sawant arrested by Mumbai police](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/01/rakhi-sawant-780x470.jpg)
महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडीओ आणि फोटो व्हायरल केल्याप्रकरणी अटक
मुंबई : एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याच्या आरोपावरून अभिनेत्री राखी सावंतला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. काही वेळाने पोलीस राखी सावंतला अंधेरी न्यायालयात हजर केले जाणार आहे. आंबोली पोलिसांनी राखीला अटक केली आहे.
राखी सावंतवर एका महिला मॉडेलचा आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केल्याचा आरोप आहे. यानंतर मॉडेलच्या तक्रारीवरून आंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. राखी सावंतचा अटकपूर्व जामीनकाल मुंबईच्या सत्र न्यायालयाने फेटाळला होता, त्यानंतर आज तिला अटक करण्यात आली आहे.
‘आंबोली पोलिसांनी राखी सावंतला ८३३/२०२२ क्रमांकाच्या एफआयआरप्रकरणी अटक केली आहे. काल राखी सावंतनं यासंदर्बात अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मात्र, तो अर्ज न्यायालयानं फेटाळला’, अशी माहिती अभिनेत्री शरलीन चोप्रानं ट्वीटमध्ये दिली आहे.
दरम्यान, राखीने शरलीन चोप्राचा एक आक्षेपार्ह व्हिडीओ पत्रकार परिषदेत दाखवला होता आणि त्यावरून आक्षेपार्ह भाषेत विधानही केलं होतं म्हणून राखी विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.