अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
![Actor Siddharth Shukla dies of heart attack](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/09/Sidharth-Shukla.jpg)
मुंबई – ‘बिग बॉस १३’चा विजेता आणि टीव्ही मालिकांमधील अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. तो ४० वर्षांचा होता. त्याच्या या अकाली निधनामुळे सिनेसृष्टीसह चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
बिग बॉस १३चा विजेता आणि टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचा जन्म मुंबईत झाला होता. त्याला मॉडेलिंग आणि अभिनयाची रुची नव्हती. त्याला व्यवसाय करायचा होता. परंतु त्याचे व्यक्तिमत्त्व आकर्षक होते. त्यामुळे २००४ मध्ये एका मॉडेलिंग स्पर्धेत त्याने आईच्या सांगण्यावरून भाग घेतला होता. त्यात त्याची निवड झाली. त्यामुळे तो मॉडेलिंगच्या क्षेत्रात आला. काही टीव्ही मालिकांमध्येही त्याने काम केले होते. रात्री झोपेत त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचे निधन झाले. त्याचा मृतदेह कूपर रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर तो त्याच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे. तरुणपणी सिद्धार्थने अशाप्रकारे एक्झिट केल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे.