अभिनेता सिद्धार्थ चांदेकरने लावलं आईचं दुसरं लग्न, फोटो सोशल मीडियावर व्हायरल..
![Actor Siddharth Chandekar arranged mother's second marriage](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/08/siddharth-chandekar-and-mitali-mayekar-780x470.jpg)
Siddharth Chandekar mother second wedding : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर याने नुकतेच आपल्या आईचे दुसरं लग्न केलं आहे. सिद्धार्थ आणि पत्नी मिताली मयेकरने आईच्या विवाहबंधनाची माहिती सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत दिली आहे. स्वत: पुढाकार घेत आईच्या लग्नाला पाठिंबा दिला. त्याच्या या निर्णयाचं अनेकांनी कौतुक केलं आहे. दरम्यान, सिद्धार्थने आपल्या आईला खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
सिद्धार्थने पोस्ट मध्ये म्हटलं की, हॅपी सेकंड इनिंग आई! तुला पण एक जोडीदार हवा, तुझ्या मुलांव्यतिरिक्त एक आयुष्य हवं, तुझं एक स्वतंत्र सुंदर जग हवं, हे कधी लक्षातच नाही आलं गं माझ्या. किती ते एकटं एकटं राहायचं? तू आतापर्यंत सगळ्यांचा विचार केलास, सगळ्यांसाठी पाय झिजवलेस. आता फक्त तुझा आणि तुझ्या नव्या जोडीदाराचा विचार कर. तुझी पोरं कायम तुझ्या पाठीशी आहेत. तू माझं लग्न थाटात लावलंस, आता मी तुझं लग्न लावतोय. माझ्या आयुष्यातलं अजून एक सुंदर लग्न. माझ्या आईचं! आय लव्ह यू आई, असं सिद्धार्थने म्हटलं आहे.
https://www.instagram.com/p/CwRNgjzoR7R/
हेही वाचा – Chandrayaan-३ : चांद्रयान-३ कधी लँडिंग करणार? कुठे पाहता येणार थेट प्रसारण? वाचा सविस्तर
Actor #SiddharthChandekar pens the sweetest note for his mother and veteran actress #SeemaChandekar, congratulating her for her second marriage ♥️
.
.#siddharthchandekar #siddharthchandekar❤️😍 #siddharth #seemachandekar #seemachandekarwedding #marriage #congratulations pic.twitter.com/EHVmL4IFG6— Pune Times (@PuneTimesOnline) August 23, 2023
मिताली मयेकरने पोस्ट मध्ये म्हटलं की, हॅपी मॅरीड लाइफ सासूबाई! माझ्या सासूचं लग्न! किती सुना हे म्हणू शकतात की मी माझ्या सासूच्या लग्नात हजर होते? खरंच मला अभिमान वाटतो तुझा की हा एव्हढा मोठ्ठा निर्णय तू अगदी न डगमगता घेतलास. मला अभिमान वाटतो तुझ्या मुलाचा की तो सुद्धा खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहिला आणि मला अभिमान वाटतो या एका अतिशय कमाल कुटुंबाचा एक भाग असण्याचा. आजवर तू आमच्या सगळ्यांसाठी सगळं अगदी मनापासून केलंस. पण आता स्वतःसाठी जगण्याची वेळ आलीये. अशीच कायम आनंदात राहा, हसत राहा. बाकी आम्ही मुलं तुझ्यासोबत आहोतच. तुला आणि नितीन काकांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेम, अशी पोस्ट मितालीने लिहली आहे.