ताज्या घडामोडीमनोरंजनमहाराष्ट्रमुंबई

अभिषेक बच्चनचा ‘बी हॅप्पी’ सिनेमा चाहत्यांच्या येणार भेटीस

‘एका एकट्या बापाची कहाणी' ज्याच्या मुलीला देशातील सर्वात मोठ्या डान्स रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करायचे

मुंबई : अभिनेता अभिषेक बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाही तर, खासगी आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. सध्या ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. दरम्यान, अभिषेक याने घटस्फोटासंबंधी पोस्ट लाईक केल्यानंतर चर्चांना अधिक उधाण आलं. एवढंच नाही तर, मुलीसोबत कायम एकत्र दिसणारे ऐश्वर्या – अभिषेक आता एकत्र दिसत नाही. ऐश्वर्या – आराध्या यांना मात्र अनेक ठिकाणी एकत्र स्पॉट केलं जातं.

जेव्हा दुबई विमानतळावर ऐश्वर्या रायला स्पॉट करण्यात आलं तेव्हा अभिनेत्रीच्या हातात साखरपुड्याची अंगठी नव्हती. ज्यामुळे घटस्फोटाच्या चर्चा पुन्हा रंगू लागल्या. ऐश्वर्या हिच्याोसोबत घटस्फोटाच्या चर्चा रंगलेल्या असताना अभिषेक बच्चन याने जुहू याठिकाणी आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बच्चन कुटुंबियांच्या ‘जलसा’ बंगल्याच्या शेजारीच अभिनेत्याने आलिशान अपार्टमेंट खरेदी केला आहे. ‘जलसा’ बंगल्याच्या भोवतीच बच्चन कुटुबियांचे पाच अपार्टमेंट आहेत. काही महिन्यांपूर्वी अशी बातमी आली होती की, अभिषेक बच्चनने मुंबईतील बोरिवली येथे असलेल्या ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये 6 अपार्टमेंट खरेदी केले.सध्या अभिषेक, पत्नी ऐश्वर्य, लेक आराध्या, आई – वडील जया बच्चन – अमिताभ बच्चन यांच्यासोबत जलसा बंगल्यात राहातो. जलसा बंगल्यातील अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. शिवाय बच्चन कुटुंब देखील कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतं.

अभिषेक बच्चन याच्या सिनेमांबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच अभिनेता ‘घूमर’ सिनेमातून चाहत्यांच्या भेटीस आला. सिनेमात अभिनेत्री सियामी आणि शबाना आजमी यांच्यासोबत झळकला. आता अभिषेक ‘बी हॅप्पी’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.सिनेमात अभिनेता एकट्या बापाच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात इनायत वर्मा अभिनेत्याच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. सिनेमाचा पहिला पोस्टर मार्च महिन्यात प्रदर्शित झाला होता. पोस्टर पोस्ट करत कॅप्शनमध्ये ‘एका एकट्या बापाची कहाणी… ज्याच्या मुलीला देशातील सर्वात मोठ्या डान्स रिॲलिटी शोमध्ये परफॉर्म करायचे आहे.’ असं लिहिलं होतं. चाहते देखील अभिनेत्याच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button