breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

‘माझ्या आयुष्यात खूप काही घडत आहे’, सुष्मिता सेनची पोस्ट चर्चेत

नवी दिली |

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री सुष्मिता सेन सतत चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. पण सुष्मिताने नुकताच केलेली पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टमध्ये तिने ‘माझ्या आयुष्यात खूप काही घडत आहे’ असे म्हटले आहे. त्यामुळे सुष्मिताच्या आयुष्यात नेमकं काय सुरु आहे? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. ४५ वर्षांच्या सुष्मिताने तिचे काही फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. या लूकमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने ‘एक वेगळा दृष्टीकोन हे सहसा आपले जीवन बदलण्याची पहिली पायरी असते. मी तुम्हा सर्वांना खूप मिस केले. माझ्या आयुष्यात खूप काही घडत होते. लवकरच मी शेअर करेन’ या आशयाचे कॅप्शन दिले होते.

https://www.instagram.com/p/CTDP06lNahC/?utm_source=ig_embed&ig_rid=1ab118e0-a84c-4cb3-8d9b-4abdb2e78260

सुष्मिताच्या ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. चाहत्यांसोबतच अनेक सेलिब्रिटींनीही त्यावर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील सुष्मिताची ही पोस्ट लाइक केली आहे. एका यूजरने ‘मला असे वाटते की तू कोणत्या तरी गोष्टीमुळे अपसेट आहेस’ असे म्हटले आहेत. तर दुसऱ्या एका चाहत्याने ‘आर्या २ कधी येणार?’ असे विचारले आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button