झाकीर हुसेन, रवीना टंडनसह महाराष्ट्रातील १२ दिग्गजांचा पद्म पुरस्काराने गौरव
६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री पुरस्कार जाहीर
मुंबई : ७४व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारकडून पद्म नागरी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये ६ पद्मविभूषण, ९ पद्मभूषण तर ९१ पद्मश्री पुरस्कार जाहीर झाले आहेत. महाराष्ट्रातील १२ जणांना पद्म पुरस्कार मिळाले आहेत.
कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा, वैद्यक, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, समाज कार्य, नागरी सेवा, व्यापार आणि उद्योग यांसह विविध क्षेत्रात असामान्य कामगिरी किंवा सेवांसाठी हे पुरस्कार दिले जातात. हे पुरस्कार पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये दिले जातात.
महाराष्ट्रातील पद्म पुरस्काराचे मानकरी :
झाकीर हुसेन – पद्म विभूषण
सुमन कल्याणपुर – पद्मभूषण
कुमार मंगलम बिर्ला – पद्मभूषण
विज्ञान क्षेत्रातून दीपक धार – पद्मभूषण
भिकू रामजी इदाते – पद्मश्री
राकेश झुनझुनवाला यांना मरणोत्तर पद्मश्री
साहित्य आणि शिक्षण – प्रभाकर मांडे – पद्मश्री
गजानन माने सामाजिक कार्य – पद्मश्री
साहित्य शिक्षण – रमेश पतंगे – पद्मश्री
कुमी वाडिया – कला क्षेत्रातून पद्मश्री
रवीना टंडन – पद्मश्री.
पद्म विभूषण पुरस्काराचे मानकरी :
डॉ. दिलीप महलानाबीस (मरणोत्तर), झाकीर हुसेन (कला), एस. एम. कृष्णा (पब्लिक अफेअर्स), बाळकृष्ण दोषी (मरणोत्तर), श्रीनिवास वर्धन, मुलायमसिंह यादव.
पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी :
एस.एल. भैरप्पा, कुमार मंगलम बिर्ला, दीपक धार, वाणी जयराम, स्वामी चिन्ना जियर, सुमन कल्याणपूर, कपिल कपूर, सुधा मूर्ती, कमलेश दी. पटेल
पद्मश्री पुरस्काराचे मानकरी :