Mahadev Online App प्रकरणी ३४ बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर
![34 Bollywood actors on ED's radar in Mahadev Online App case](https://mahaenews.com/wp-content/uploads/2023/10/Mahadev-Online-App-780x470.jpg)
मुंबई : महादेव ऑनलाईन गेमिंग अॅप प्रकरणी ३४ बॉलिवूड कलाकार ईडीच्या रडारवर आले आहेत. १८ सप्टेंबरला UAE मध्ये झालेल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशन आणि पार्टीमध्ये सहभागी झालेल्या कलाकारांची नावं समोर आली असून त्यात सुनील शेट्टी, संजय दत्त, रश्मिका मंदाना यांच्यासह ३४ बॉलिवूड कलाकारांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपचे मालक सौरभ चंद्राकरने UAE मध्ये झालेल्या त्याच्या लग्नात २०० कोटी खर्च केला होता. २०० कोटी रुपये उधळल्यामुळे तो चर्चेत आला. ईडी आता या प्रकरणील मनी लाँडरींगचा तपास करत असून सौरभच्या लग्नाला UAE मध्ये जे बॉलीवूड जे अभिनेता, अभिनेत्री व गायक उपस्थित होते व त्याचबरोबर काही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्यांनी महादेव बुक अॅपचा प्रचार केला होते त्यांना चौकशीसाठी बोलवलं जाणार आहे.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमधील PSI झाला ड्रीम ११ च्या माध्यमातून करोडपती!
हे कलाकार ईडीच्या रडारवर?
- दीप्ती साधवानी
- रफ्तार
- सोनू सुद
- सुनील शेट्टी
- संजय दत्त
- हार्दी संधू
- सुनील ग्रोव्हर
- रश्मिका मंधाना
- सोनाक्षी सिन्हा
- गुरू रंधावा
- टायगर श्रॉफ
- सारा अली खान
- सुखविंदर सिंग
- कपिल शर्मा
- मलायका अरोरा
- डिजे चेतस
- नोरा फतेही
- नुसरत भरूचा
- मौनी रॉय
- अमित त्रिवेदी
- सोफी चौधरी
- आफताब शिवदासानी
- डेझी शाह
- नर्गिंस फाकरी
- उर्वशी रौतेला
- इशिता राज
- नेहा शर्मा
- स्नेहा उलाल
- प्रीती जांगियानी
- शमिता शेट्टी
- एलनाझ
- सोनाली सहगल
- इशिता दत्ता
- ज्योर्जिओ अँड्रियानी