breaking-newsमनोरंजन

2.0 मध्ये रजनीकांतऐवजी हा बॉलिवूड सुपरस्टार साकारणार होता चिट्टी रोबोट

बहुप्रतिक्षित ‘2.0’ हा चित्रपट रजनीकांतशिवाय अपूर्णच असता असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सबकुछ रजनीकांत असलेला हा चित्रपट २९ नोव्हेंबरला जगभरात प्रदर्शित होत आहे. २०१० साली आलेल्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा ‘2.0’ हा सिक्वल असणार आहे. भारतातील सर्वाधिक बजेट असलेल्या या चित्रपटाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत. विशेष म्हणजे रजनीकांत यांनी साकारलेल्या चिट्टी रोबोटला आठ वर्षांनंतर पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत.

पण अनेकांना आश्चार्य वाटेल की सुरूवातीला रजनीकांत यांनी ‘2.0’ करायला एस शंकर यांना नकार दिला होता. प्रकृतीच्या कारणावरून हा चित्रपट करायला जमणार नाही असं रजनीकांत म्हणाले होते, तसेच या चित्रपटासाठी शंकर यांनी दुसऱ्या एखाद्या सुपरस्टारची निवड करावी असाही सल्ला त्यांनी दिला होती. शेवटी रजनीकांत यांच्या नकारानंतर शंकर यांनी शाहरुखच्या नावाचा विचार ‘2.0’ साठी केला.

शाहरुख ‘2.0’ मध्ये चिट्टी रोबोटची भूमिका साकरणार होता. याआधी आमिरलाही या भूमिकेसाठी विचारण्यात आलं होतं. मात्र २०१४ मध्ये रजनीकांत यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली त्यांनी ‘लिंगा’ हा चित्रपटही केला. ‘लिंगा’च्या प्रदर्शनानंतर पुन्हा एकदा शंकर यांनी रजनीकांत यांचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. अखेर रजनीकांत यांनी ‘2.0’ ला होकार दिला. ‘2.0’ मध्ये अनेक अॅक्शन स्टंट असल्यानं रजनीकांत यांनी आधी नकार दिला होता.

जगभरातील १० हजार स्क्रिनवर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं अक्षय आणि रजनीकांत पहिल्यांदाच एकत्र काम करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button