Breaking-newsमनोरंजन

भारताचा पहिला सुपरहिरो परतला; ‘शक्तिमान’ आता अॅमेझॉन प्राइमवर

‘होता है जब आदमी को अपना ज्ञान, कह लाया वो..’ या वाक्याच्या शेवटी येणारं नाव जर तुम्ही ओळखू शकलात, तर तुम्हाला नक्कीच टेलिव्हिजनवरील सर्वांत लोकप्रिय सुपरहिरोविषयी माहीत आहे. तो सुपरहिरो म्हणजे ‘शक्तिमान’. शक्तिमान ही व्यक्तिरेखा ९० च्या दशकातील मुलांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला होता. रविवार आला की दुपारचे बारा कधी वाजतील याचीच प्रतिक्षा लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच असायची. तेच दिवस आता पुन्हा आले आहेत असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण ‘शक्तिमान’ आता अॅमेझॉन प्राइमवर पाहायला मिळणार आहे.

‘शक्तिमान’चे दोन सिझन अॅमेझॉन प्राइमवर आले आहेत. मुकेश खन्नाची मुख्य भूमिका असलेली ही मालिका आता डिजीटल प्लॅटफॉर्मवर सर्वांनाच पाहायला मिळणार आहे. ही मालिका पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर यावी अशी इच्छा मुकेश खन्ना यांनी व्यक्त केली होती. नव्वदच्या दशकात डीडी नॅशनलवरील ही सर्वाधिक कमावणारी मालिका होती. १३ सप्टेंबर १९९७ ते २७ मार्च २००५ या कालावधीत ही मालिका प्रसारित झाली.

‘शक्तिमान’ आणि ‘गंगाधर’ या दोन्ही भूमिका साकारणाऱ्या मुकेश खन्नाने सर्वांची मनं जिंकली होती. ‘कानून का दोस्त, मुर्जिमों का दुश्मन,’ हे शक्तिमानचे तर ‘अंधेरा कायम रहे,’ हे किल्विश या खलनायकाचे संवाद तुफान गाजले.

मालिकेच्या शेवटी येणाऱ्या ‘छोटी छोटी मगर मोटी बातें’ यातून दिला जाणारा सामाजिक संदेश आणि ‘सॉरी शक्तिमान’ हा माफी मागतानाचा शब्द आजही अनेकांच्या आठवणीत असेल. छोट्या पडद्यावर एक मैलाचा दगड ठरलेली ही मालिका ‘अॅमेझॉन प्राइम’च्या निमित्ताने पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याने ‘शक्तिमान’च्या चाहत्यांकडून आनंद व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button