६५ वे राष्ट्रीय पुरस्कार: ‘कच्चा लिंबू,’ ‘न्यूटन’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
नवी दिल्ली : ६५ व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा आज करण्यात आली. त्यात कच्चा लिंबू हा सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमा ठरला तर न्यूटनला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला. ‘मय्यत’ला बेस्ट शॉर्ट फिल्म पुरस्कार तर नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘पावसाचा निबंध’लाही शॉर्टफिल्म पुरस्कार जाहीर झालाय.
यशराज क-हाडेच्या ‘म्होरक्या’ला फिचर फिल्ममध्ये स्पेशल मेन्शन पुरस्कार जाहीर झालाय. ‘म्होरक्या’चं दिग्दर्शन अमर देवकर यांनी केलयं. तर अब्बास अली मोगल यांना ‘बाहुबली 2 -द कन्क्लुजन’साठी बेस्ट ॲक्शन, डिरेक्शनसाठी पुरस्कार जाहीर झालाय. शिवाय, ‘मृत्यूभोग’ या मराठी चित्रपटाला सर्वोत्कृष्ट संकलनाचा पुरस्कार जाहीर झालाय.
दरम्यान, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना मॉम या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार जाहीर झालाय.
सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक- गिरधर झा
सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपट -मयुराक्षी
सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपट – एबेतु रमाका
सर्वोत्कृष्ट मल्याळम चित्रपट – थोडीमुथ्थलम द्रिक्षशियम
सर्वोत्कृष्ट तेलगु चित्रपट – गाजी
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री-दिव्या दत्ता (इरादा चित्रपटासाठी)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शक : ए. आर. रहमान (कात्रूवेलीयीदई साठी)
सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी – अक्षय कुमारचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपट