breaking-newsमनोरंजनराष्ट्रिय

‘हिंदुस्तानी’ कमल हासन म्हणतो ‘हिंदू’ शब्द मुघलांच्या आधी अस्तित्त्वातच नव्हता!

हिंदू हा शब्द मुघल आणि परकियांच्या आक्रमणाआधी हिंदू हा शब्द अस्तित्त्वातच नव्हता असे वक्तव्य आता दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटणार यात शंकाच नाही. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला हिंदू दहशतवादी होता असे वक्तव्य कमल हासन यांनी केले होते. त्यामुळे वादंग निर्माण झाला. त्यानंतर कमल हासन यांनी प्रत्येक धर्मात दहशतवादी असल्याचंही वक्तव्य केलं होतं. आता त्यांनी हिंदू हा शब्द मुघलांच्या परकियांच्या आक्रमणाआधी अस्तित्त्वातच नव्हता असे म्हटले आहे.

Kamal Haasan

@ikamalhaasan

2,931 people are talking about this

कमल हासन यांनी तामिळ भाषेत एक ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी हिंदू या शब्दाचा उल्लेख कोणत्याही प्राचीन धर्मग्रंथात आढळत नाही असे म्हटले आहे. हिंदू हा शब्द विदेशी हल्लेखोरांनी आणि मुघलांनी दिला आहे. त्या शब्दाचा प्रयोग करण्यापेक्षा आपण भारतीय असेच संबोधन केले पाहिजे असेही मत त्यांनी नोंदवले आहे. हिंदू हा शब्द धर्मासाठी वापरणं गैर आहे आपण सगळे भारतीय आहोत. आपली ओळख भारतीयच असली पाहिजे असेही कमल हासन यांनी म्हटले आहे.

मक्कल निधी मय्यम या पक्षाचे प्रमुख आणि दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन म्हणतात, शैव, वैष्णव पंथीयांनी किंवा कुणीही हिंदू या शब्दाचा उल्लेख प्राचीन धर्मग्रंथांमध्ये केलेला नाही. मुघलांच्या आणि परकियांच्या अतिक्रमाणाआधी हा शब्दच अस्तित्त्वात नव्हता. तसेच ब्रिटिशांनी जेव्हा आपल्या देशावर राज्य केले तेव्हा त्यांनी हिंदू हा शब्द प्रचलित केला असेही हासन यांनी म्हटलं आहे. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी होता असे म्हणणाऱ्या कमल हासन यांच्यावर हिंदू संघटनांनी निशाणा साधला होता. तसेच साध्वी प्रज्ञा ठाकूर यांनी तर कमल हासन दहशतवादी नाही तर देशभक्त होता असंही वक्तव्य केलं. मात्र त्यावरूनही साध्वी प्रज्ञा ठाकूर यांच्यावरही बरीच टीका झाली. हा सगळा वाद कुठे शमत नाही तोच हिंदू हा शब्द आपला नाहीच आपण आपली ओळख भारतीय अशीच ठेवली पाहिजे असं कमल हासन यांनी म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button