Breaking-newsमनोरंजन

“स्टारकिड्समुळे मलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता”

बॉलिवूड आणि त्यात असणाऱ्या घराणेशाहीवर आतापर्यंत  बाहेरून आलेल्या अनेक कलाकारांनी आवाज उठवला आहे. यात कंगनापासून ते तापसी पन्नू सारख्या आघाडीच्या अभिनेत्रींचा समावेश आहे. घराणेशाहीमुळे बॉलिवूडमध्ये अनेक संधी नाकारल्या गेल्या असल्याचे आरोप अनेक अभिनेते, अभिनेत्रींनी केले आहेत. नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘थप्पड’ या चित्रपटाची नायिका तापसीनंही  याचा वाईट अनुभव एका मुलाखतीत शेअर केला आहे. 

‘स्टारकिड्समुळे मलाही संधी नाकारण्यात आली होती, मलाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. तो एक काळ होता जेव्हा मी खूप रडले होते. हे आतादेखील माझ्यासोबत होऊ शकतो. या क्षेत्रात घराणेशाही आहे मात्र त्यामुळे तुम्हाला काम मिळत नाही म्हणून रडत बसायचं की परिस्थितीतून मार्ग काढून पुढे जायचं हे तुम्ही ठरवायचं’ असं  तापसीनं या मुलाखतीत म्हटलं

गेल्यावर्षी ‘पती पत्नी और वो’  या चित्रपटातून तापसीला बाजूला करून अनन्या पांडे या स्टारकिडला संधी देण्यात आली होती. तापसीनं यावर आवाजही उठवला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button