breaking-newsमनोरंजन
‘सिंटा’द्वारे करण्यात येणार तनुश्री-नाना प्रकरणाची चौकशी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/tanushree-vs-nan.jpeg)
मुंबई- तनुश्री-नाना प्रकरणासंदर्भात महिला आयोगाने नाना पाटेकर आणि इतर चौघांना नोटीस बजावल्या आहेत. तसेच या प्रकरणाची सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशनला (सिन्टा) तत्काळ तक्रार निवारण समिती (आयसीसी) स्थापन करण्याचे आदेशही राज्य महिला आयोगाने दिले आहेत.
‘सिंटा’द्वारे (सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन) पुन्हा एकदा चौकशी केली जाणार आहे. ‘सिंटा’च्या नियमानुसार, तीन वर्षे जुनं प्रकरणच ‘सिंटा’ हाताळू शकते. तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणाला आता दहा वर्षे झाली आहेत. मात्र, या प्रकरणात नाना किंवा तनुश्री यांनी नव्यानं तक्रार दाखल केली तर आम्ही चौकशी करण्यास तयार असल्याचे ‘सिंटा’ने स्पष्ट केले आहे.