सारा अली खान होती आधी एवढी फॅट…ओळखणही कठीण…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/Untitled-134.png)
बॉलिवूडची क्युट गर्ल म्हणजेच अभिनेत्री सारा अली खान सध्या आगामी चित्रपट लव आज कलमुळे चर्चेत आली आहे. या चित्रपटात सारासोबत कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तिने अभिनयासोबत तिच्या ग्लॅमरस अदांनी रसिकांना भुरळ पाडली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून फोटो व व्हिडिओमुळे चर्चेत असते. यावेळी साराने इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही हैराण व्हाल.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/6D7641DB-6C04-46AB-AFB7-5AC3D3626CD0-1024x574.jpeg)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/sara-khan-throwback.jpg)
साराने तिच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत सारा खूप जाडी दिसते आहे. पहिल्यांदा व्हिडिओ पाहताना तुम्हाला ही सारा आहे असा विश्वासच बसणार नाही. व्हिडिओमध्ये सारा अली खान मस्ती करताना दिसत आहे.
साराचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत ती फ्लाइटमध्ये तिच्या मैत्रिणींचा व्हिडिओ बनवत आहे. आणि बॅकग्राउंडला गाणं वाजतंय की सर जो तेरा चकराए या दिल डुबा जाए. साराने व्हिडिओ शेअर करत प्रेझेंटिंग सारा का सारा सारा असं लिहिलं आहे. साराच्या या पहिल्या लुकमध्ये आणि आताच्या लुकमध्ये जिमिन- आसमानचा फरक असल्याचं दिसत आहे.