‘सविता भाभी, तू इथंच थांब…’ पोस्टरमागील गुपित उलगडलं…पहा काय ते…
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Untitled-113.png)
‘सविता भाभी, तू इथंच थांब….’ असा मजकूर लिहिलेल पोस्टर पुणे शहराच्या चौकाचौकात झळकलं. या पोस्टर वरून सर्वच पुणेकर भांडावून गेले होते…ही ‘सविता भाभी’ नेमकी कोण? हे पोस्टर कोणी लावले याचं कुतूहल पुणेकरांना होतं. मात्र पुण्याच्या चौकात झळकणाऱ्या या पोस्टरबाजीमागे ‘अश्लील उद्योग मित्रमंडळा’चा हात तर नाही ना? की हा निव्वळ योगायोग समजावा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/Ashlil-Udyog-Mitramandal-Poster.jpg)
आता ‘अश्लील उद्योग मित्रमंडळ’ कोण हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण हे कोणतंही ‘मंडळ’ नसून सई ताम्हणकर, पर्ण पेठेचा आगामी मराठी चित्रपट आहे. पुण्याच्या चौकाचौकात ‘सविता भाभी’च्या नावाचे पोस्टर लागले अन् दुसऱ्याच दिवशी ‘अश्लील उद्योग मित्रमंडळा’चा टीझरही सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यामुळे ही या चित्रपटाची ही जाहीरातबाजी असावी अशी शक्यता आहे.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/2-4.png)
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/1-3.png)
विशेष म्हणजे या चित्रपटातील प्रमुख पात्राचं नावही ‘सविता’च आहे. सईनं या सविताची भुमिका साकारली आहे. या टीझरमध्ये ‘सविता अख्खं शहर वाट बघतंय तुझी!’ असं लिहिल्यानं या पोस्टरमागेही ‘अश्लील उद्योग मित्रमंडळा’चाच हात असल्याची शक्यता आहे. आलोक राजवाडे दिग्दर्शित या चित्रपटाची ही हटके जाहिरातबाजी सर्वांनाच चक्रावून टाकणारी आहे. ६ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.