सलमानच्या फॅनकडून शाहरुखला डिवचण्याचा प्रयत्न
बॉलिवूडमध्ये शाहरुख खान हा असाच एक ऍक्टर असेल, जो सोशल मिडीयामधून आपल्या फॅन्सच्या प्रश्नांना उत्तरे देत असतो. आपल्या पोस्टवर पडलेल्या कॉमेंटनाही तो उत्तर देत असतो. त्यामध्ये काही फॅन्सच्या आचरट प्रश्नांनाही त्याने आपल्या स्टाईलने उत्तर दिल्याचे आढळून येते. एका फॅनने अलिकडेच शाहरुखला डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र शाहरुखने त्याला दिलेले उत्तर फारच मार्मिक होते.
“शाहरुख सर, मी सलमान सरांचा खूप मोठा फॅन आहे. हे ऐकून तुम्हाला कसे वाटले.’ असे त्या फॅनने शाहरुखला विचारले. त्यावर शाहरुखने तत्परतेने या फॅनला उत्तर दिले आहे. आपण स्वतःही सलमान खानचे फॅन आहोत, असे शाहरुखने म्हटले आहे. शाहरुखचा हा हजरजबाबीपणा ही त्याची खासियत बनला आहे. शाहरुख आणि सलमानमधील कोल्डवॉर सगळ्यांनाच माहिती आहे.
एक वेळ तर अशी होती, की हे दोघेही एकमेकांकडे बघतही नसत. म्हणूनच या फॅनने शाहरुखला मुद्दाम डिवचण्यासाठी आपण सलमानचे फॅन असल्याचे म्हटले असावे. पण आता शाहरुख आणि सलमानमधील दोस्ती पुन्हा पहिल्यासारखी सुरू आहे, हे कदाचित त्याला माहीत नसावे. सलमानच्या “ट्युबलाईट’मध्ये शाहरुखने छोटासा रोल केला होता, आता शाहरुखच्या सिनेमामध्येही सलमान छोटासा रोल करणार आहे.