सनी लिओनची मुलाखत घेणार करिना कपूर
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/sunny-karina-.jpg)
गेली काही वर्षे तैमूरच्या बालपणामुळे आघाडीवर असणारी अभिनेत्री करीना कपूर चित्रपटसृष्टीपासून दूर होती. तिने काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडमध्ये “वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाद्वारे कमबॅक केले. ही अभिनेत्री आता लवकरच रेडिओवरही आपला शो घेऊन येणार असल्याची माहिती काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. या शोच्या पहिल्याच भागात आता करिनाने सनी लिओनला आमंत्रित केले असल्याची माहिती समोर आली आहे.
करिनाने नुकतेच या शोचे चित्रीकरण पूर्ण केले आहे. सनी आणि करिना या माध्यामातून पहिल्यांदाच एकत्र झळकताना दिसणार आहेत. करिना यात सनी लिओनची मुलाखत घेणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे करिना आणि सनीच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
येत्या डिसेंबरपासून करिना कपूरचा हा चॅट शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. करिना कपूर आणि करण जोहरच्या मैत्रीबद्दल तर सर्वांनाच माहिती आहे. या मैत्रीच्या नात्यामुळेच करणने करिनाला रेडिओ शोबद्दल कल्पना दिली आहे. करण स्वत:च “कॉलिंग करण’ नावाने रेडिओवर एक शो घेऊन येत असतो.