‘सत्यमेव जयते’पेक्षा ‘गोल्ड’च सरस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/08/movie-1-.jpg)
स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रदर्शित झालेले ‘गोल्ड’ आणि ‘सत्यमेव जयते’ चित्रपट प्रेक्षकांच्या चांगल्या पसंतीस उतरले असून पहिल्या दिवशी चांगली कमाई केली आहे. परंतु, सत्यमेव जयते पेक्षा कमीबाबत गोल्ड सरस असलायचे चित्र आहे. अक्षय कुमारच्या गोल्ड चित्रपटाने २७ कोटींची कमाई केली आहे. तर सत्यमेव जयतेने १८ कोटींचा गल्ला जमविला. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श आणि रमेश बाला यांनी चित्रपटांच्या कमाईचे आकड्यांची ट्विटरवरून माहिती दिली.
‘गोल्ड’ हा चित्रपट १९४८ साली स्वतंत्र भारताने जिंकलेल्या पहिल्या सुवर्णपदकावर आधारित आहे. भारताने इंग्रजांचा त्यांच्याच भूमीवर पराभव केला होता. तर ‘सत्यमेव जयते’ चित्रपटात जॉन अब्राहम पोलीस भ्रष्टाचाराविरोधात लढताना दिसत आहे.
दोन्ही चित्रपटाची ओपनिंग कमाई दमदार झाली असून वीकेंडला आकडा वाढवण्याची शक्यता आहे. गोल्ड आणि सत्यमेव जयते चित्रपट देशातील जवळपास २५०० स्क्रीन्सवर रिलीज करण्यात आला आहे.